Breaking News

गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडले

🔺जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर(दि.10सप्टेंबर):- गोसीखुर्द धरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने गोसेखुर्द धरणाचे एकूण 17 दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे सावली, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, मुल आदी तालुक्यातील नदी काठावरील गावातील नागरिकांना व प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

गोसीखुर्द धरणाचे 17 दरवाजे उघडल्याने 2067 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच, रात्रभरात पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता असून 5 ते 10 हजार क्युमेंक्स पर्यंत विसर्ग वाढू शकतो.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *