वर्धा: जिल्हा प्रतिनिधी :- दि.05 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षकदिनानिमित्त स्वयं शासन कार्यक्रम आयोजित करण्यात आला…covid 19 च्या पार्श्वभूमी वर त्या गरजू व होतकरु विद्यार्थीनी खुप सुंदर अश्या छोट्या कार्यक्रमाचे आयोजन केले
या कार्यक्रमान्वये त्यांच्या 10 वि च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली , त्यांच्या चिमुकल्या शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना छान प्रकारे शिकविले ,सर्व मुलांनी शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच covid -19 च्या पार्श्वभूमी वर प्राजक्त मूते यांंना त्यांचे क्लास सुरु करावे लागले, आज होत असलेल्या ऑनलाइन क्लास मुळे काही विद्यार्थी क्लास करु शकत नाही, त्यांच्या कडे मोबाइल नाही , तर ते विद्यार्थी कसे शिक्षण घेतील, या विचारणे त्यानी गरजू व होतकरु विद्यार्थ्यांसाठी क्लास सुरु केले ,social distancing ने ते विद्यार्थ्यांना बसवूंन ते विद्यार्थिना शिक्षणाचे धडे.देत आहेत ,आणि त्याना पुन्हा एक मदतीचा हात आणि त्याच्या जिवनात ओंजळ भर प्रकाश देत आहे.कु प्राजक्ता ताई मुते यानी खरच खुप आशेने मुलाना पुन्हा शिकवायला सूर्वात केली आहे , त्या गरजू व होतकरू मुलामुलींना शिकविन्याचे काम 7 वर्ष पासून करत आहे.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मनोज उईके ,पंकज देशमुख ,सारंग नेवारे ,प्रगती प्मुते इत्यादी उपस्थित होते,सर्व शिक्षकांनी कोविड19 महामारी च्या काळामध्ये विदयार्थियांनी कसा अभ्यास करावा ,याचे सुद्धा मार्गदर्शन केले,व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आहे.