Breaking News

वर्धा: कोरोना कहर : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णासह मृत्यू संखेत होत आहे वाढ : आज 59 कोरोनाबाधित तर 7 व्यक्तींचा मृत्यू

Advertisements

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- सोमवार दि.14 रोजी आज 586 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 41 पुरुष तर 18 महिलांंचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांंची सर्वात मोठी मृत्यू संख्या आज झाली आहे आज जिल्ह्यात 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे.यामध्ये (हिंगणघाट महिला 60, पुरुष 61,आर्वी महिला 68, पुलगाव पुरुष 67, वर्धा पुरुष 61, 56, 62) असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 54 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -53 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1चा मृत्यू झाला आहे. आज 58 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.

Advertisements

आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये

Advertisements

1) वर्धा 26 (पुरुष 21 महिला 5)

2) देवळी 6 (पुरुष 5 महिला 1)

3) सेलू 6 (पुरुष2 महिला 4)

4).आर्वी 5 (पुरुष 3 महिला 2)

5) आष्टी 1 (पुरुष 1 )

6) कारंजा 1( महिला 1)

7)समुद्रपूर 1(पुरुष 1 -)

8)हिंगणघाट 13 (पुरुष 8 महिला 5) समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने 27334 असून यामध्ये 27292 अहवाल प्राप्त झाले आहे. तर एकूण 24418 अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर यामध्ये 42 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांंची संख्या 2629 झाली असून यामध्ये एकूण 1311 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज जिल्ह्यात एकूण 1264 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 76742 व्यक्ती गृह विलगिकरण करण्यात आले आहे.तर यामधून आज 2154 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 567 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेले आहे.
जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्या व मृत्यू संख्या पाहता नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्याच सोबत शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

खूप झाले उत्सव, महोत्सव : आता रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या!

उत्सव, महोत्सव, सभा, संमेलन, लोकार्पण, उद्घाटन, बैठका, कीर्तन, भजन पुरे झाले, आता मृत्यूचे सापळे ठरणाऱ्या …

गोंदिया विमानतळावरून इंदूर,दिल्ली,बंगळुरू विमानसेवा

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *