Breaking News

वर्धा:- कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती उपल्बध करून देणारी व्यवस्था करण्यात यावी- सलुन ब्युटी पार्लर असोसीएषन वर्धा जिल्हा

Advertisements

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती उपल्बध करून देणारी व्यवस्था  उभारण्यात यावी या मागणीचे निवेदन सलुन ब्युटी पार्लर असोसीएषन वर्धा जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच खासदार रामदासजी तडस व आमदार डॉ.पंकज भोयर यांना देण्यात आले.

Advertisements
उपरोक्त विषयान्वे सलुन ब्युटी पार्लर असोसीएशन वर्धा जिल्ह्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातलगामध्ये उपचारा बाबत संभ्रम आहेत ते दुर करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांंना साहनुभुतीपूर्वक वागणूक देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्मान करून रूग्नाच्या नातलगांंना रूग्नाच्या प्रकृतिबाबत दररोज माहिती उपल्बध करून देनारी व्यवस्था उभी करत रुग्णासह रुग्णांच्या नातलगाचेही समाधान करण्याची कार्यप्रणाली वर्धा जिल्हातील कोव्हिड सेंटरच्या माध्यमातुन ताबडतोब करण्यात यावी जिल्हात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था अपुरी पडण्याची भिती निर्माण झाली आहे कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्ण संख्या वाढत आहे. याचा परीणाम नक्कीच आरोग्य व्यवस्थेवर होत आहे. असे असले तरी मात्र सेवा भावनेतुन योग्य वागणूक या रुग्णांंना दिल्या गेली पाहीजे हा संसर्गजन्य रोग असल्याने रुग्णाजवळ रुग्णांंच्या नातलगांंना थांबण्यास मनाई आहे. त्यामुळे उपचाराबाबत नातलगामध्ये शंका निर्माण होत असुन आरोग्य विभागावर नागरीकांचा अविश्वास निर्माण होत आहे. हि बाब लक्षात घेता येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांंच्या नातलगांंना रूग्नाच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती पुरवावी व सक्षम व्यवस्था उभी करण्यात यावी या व्यवस्थेच्या माध्यमातुन रूनाची सध्या स्थीती , ऑक्सीजन लेवल , त्यांना झालेले इन्फेक्शन व त्याच्यावर सुरू असलेल्या उपचाराबाबत अवगत करण्यात यावे कोव्हिड सेंटरमध्ये बेडची संख्या वाढवण्यात यावी.
रुग्णांंना नातलगांशी मोबाईल द्वारे बोलण्याची मुभा देण्यात यावी कोरोना संशयीत रुग्णाची तत्काळ चाचनी करून त्यांचा अहवाल ताबडतोब देण्यात यावा आपन योग्य ती दखल घेऊन या कोरोना महामारीमुळे जनतेत पसरलेला असंतोष व भितीचे वातावरण दुर करावे हि अशी विनंती या निवेदनातुन सलुन ब्युटी पार्लर असोसीएषन वर्धा जिल्हाच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य वर्धा तालुका सचिव निलेश खरोडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आशिष इझनकर ,महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष लिलाधर येउलकर ,प्रदेश कार्यध्यक्ष श्रीकांत वाटकर ,प्रदेश अध्यक्ष विवेक अतकर, वर्धा जिल्हा कोषाध्यक्ष स्वपनिल घुमे ,तालुका कोषाध्यक्ष राहुल अतकरे उपस्थित होते.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? प्रयोग के लिए सावधानियां जरुरी

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? …

पेेट की चर्बी कम करने के लिए 6 बातों का रखें ख्याल? बढा पेट अंदर होने लगेगा!

पेेट की चर्बी कम करने के लिए 6 बातों का रखें ख्याल? बढा पेट अंदर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *