* आर्वी तळेगांव या रेंगाळलेल्या कामाचा मुद्दा संसदेत उपस्थित
* विद्यमान ठेकेदाराचा कंत्राट रद्द करुन नविन निविदा प्रक्रिया लवकरच पुर्ण होणार.
दिल्ली/वर्धा: वर्धा जिल्हयातील आर्वी तळेगांव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 347 अ चे निर्माण कार्य अनेक महिन्यापासुन प्रलंबीत आहे. या कामाचा त्रास प्रत्येक प्रवाश्याला होत असुन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी लोकसभे मध्ये अतारांकित प्रश्न संख्या 745 अंतर्गत मुद्दा उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले.
केन्द्रीय महामार्ग मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी या प्रश्नाला उत्तर देतांना स्पष्ट केले की, कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प पुर्ण होऊ शकला नाही, सरकारने या विषयाच गांभीर्याने दखल घेतली असुन विद्यमान कंत्राटदाराचा करारनामा रद्द करुन नविन निविदा प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. केन्द्रसरकार उर्वरीत विकास कार्य नोव्हेंबर 2021 पर्यंत पुर्ण करण्याकरित प्रयत्नशील आहे असे उत्तर त्यांनी खासदार रामदास तडस यांच्या प्रश्नाला दिले.
वर्धा जिल्हयात वर्ष 2014 नंतर अभुतपूर्व महामार्ग विकास झालेला आहे, परंतु दुर्दैवाने आर्वी-तळेगांव या महामार्गाचे विकास काम विहीत वेळेत पुर्ण होऊ न शकल्याने आज संसदेत हा विषय उपस्थित केला. केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी दिलेल्या उत्तरानुसार हा प्रलंबीत प्रकल्प नोव्हेंबर 2021 पर्यंत केन्द्रसरकार निश्चीतच पुर्ण करेल असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त करुन केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या उत्तरावर समाधान व्यक्त केले.