Breaking News

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम नागरीकांनी आरोग्य विभागाच्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हावे – दिलीप उटाणे

Advertisements
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोवीड १९  विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा  व आरोग्य कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत  असे असले तरी  कोरोणावर लस  किंवा हमखास तोडगा निघत नाही त्यावर  संपूर्ण नियंत्रण  येई पर्यत आता जीवनशैलीमध्ये  काही बदल करने  आवश्यक झाले आहे  त्यामुळे नागरीकांनी  आरोग्य विभागाच्या नेटवर्क मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर अंतर्गत कोल्हापूर (राव) येथे  ३ आँक्टोबर रोजी *माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम* गृहभेटीत नागरीकां सोबत संवाद साधून  – माझे कुटुंब माझी जबाबदारी  मोहीम  अतंर्गत लोकांच्या मनात भिती व गैरसमज असल्यामुळे आरोग्य पथकास योग्य माहिती देत नाही यासाठी ग्राम पंचायत सदस्यानी लोक प्रतिनिधी यांनी लोकांची समजुत घालून.होणाऱ्या बाधीत रुग्णाला वेळीच उपचार देण्यासाठी मदत होईल ,
  ते पुढे म्हणाले  *माझे कुटुंब  माझी जबाबदारी अंतर्गत आरोग्य कर्मचारी पथक घरोघरी जावून कुटुंबातील सदस्या सोबत आतंरव्यक्ती संवाद करुन घरातील सदस्यांना सर्दी ताप खोकला  आहे काय?  *इन्फ्यारेड थरमा मिटर* व्दारे  ताप . व *पल्स आँक्सीमिटर* व्दारे   शरिरातील आँक्सिजन पातळी  तपासणी करण्यात येत   आहे .जर एकाद्या व्यक्तीच्या रक्तातील आँक्सिजन ९५ % पेक्षा कमी असल्यास साभाव्य  बाधित  व्यक्तीचा शोध घेतला जातो .तरी नागरीकांनी न घाबरता न भिता घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य माहीती द्यावे असे आवाहन आरोग्य सेवाक दिलीप उटाणे यांनी केले .
मास्कचा उपयोग .सुरक्षित अंतर.निर्जंतुकीकरणाचा वापर  या पलीकडे जाऊनआता वैयक्तिक .कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात बदल करणे  गरजेचे आहे .त्या माध्यमातून कोरोणावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर *माझे कुटुंब माझी जबाबदारी*  हि मोहीम घरोघरी जावून आरोग्य तपासणी करुन राबविण्यात येत आहे.
*   *आपले कुटुंब सुरक्षित  ठेवण्यासाठी  जिल्हाधिकारी विवेक भिमनवार .जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे   जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले  जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ   प्रभाकर नाईक यांनी घरोघरी  आरोग्य तपासणी करणाऱ्या पथकास योग्य माहिती देवून  सहकार्य करावे असे आवाहन केले*
आरोग्य तपासणी आरोग्य सेवक दिलीप उटाणे माधव कातकडे  आशा वर्कर कुसूम नाल्हे  ज्योषना भगत  शोभा चिंचघाटे  स्वयसेवक राम नाल्हे पेम मानकर. यांनी केले.
सदर मोहिमेत नागरिकांना कोवीड नियंत्रणासाठी कोरोणासोबत जगायला शिकणे आजची गरज आहे  यासाठी ञिसूञी     *नागरीकांनी आपापसात २ मिटरचे सुरक्षित अंतर ठेवणे*  *मास्कचा कटाक्षाने नियमित पणे व योग्य  वापर करणे* *वारंवार हात स्वच्छ धुणे तसेच निर्जुंतुकीकरण दाव्य ( सँनिटायझर) चा            योग्यरित्या वापर* इत्यादी माहीती आरोग्य शिक्षण देण्यात आले.
*वैयक्तिक स्तरावर* रोज सकाळी शरीरातील तापमान.प्राणवायू पातळी मोजून घ्यावे . मास्कचा सदैव उपयोग करावा . मास्क काढून ठेवू नये,नाकाखाली मास्क ठेवू नये,कुटुंबातील सदस्यांनी  एकमेका विषयी काळजी घ्यावी.चेहऱ्याला किंवा मास्कला वारंवार हात लावू नये वारंवार हात धुवावे. . *तसेच गावात  वसाहतीत  मध्ये घ्यावयाची काळजी* इत्यादी खबरदारीचा उपाय आरोग्य पथका व्दारे आरोग्य शिक्षणाचे व्दारे सांगितले जात आहे .नागरीकानी दिलेल्या सुचनाचे पालन केल्या  निश्चितच कोरोणा महामारीला आळा घालू शकतो अशा विश्वास आरोग्य विभाला आहे असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले यांनी केले आहे
Advertisements

About Vishwbharat

Check Also

शारीरिक ताकत बढाने के लिए इमली के बीज का पावडर के उपयोग के रामबाण फायदे

शारीरिक ताकत बढाने के लिए इमली के बीज का पावडर के उपयोग के रामबाण फायदे …

लैंगिक लकबा (पेनिस पिरालेसेस) नपुंसकता सहित अन्य असाध्य गुप्तरोग समस्या निवारण के लिए रामबाण वनौषधीय है अतिवला का पौधा

लैंगिक लकबा (पेनिस पिरालेसेस) नपुंसकता सहित अन्य असाध्य गुप्तरोग समस्या निवारण के लिए रामबाण वनौषधीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *