नागपूर, 09 नोव्हेंबर : राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती मदतारसंघात पदविधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. त्याममध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून महापौर संदीप जोशी, औरंगाबाद येथून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख व अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.
निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर 2 जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत.
या जागांसाठी येत्या 1 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत असून 3 डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघात संग्राम देशमुख, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात शिरीष बोराळकर, नागपूर पदवीधर मतदारसंघात संदीप जोशी, अमरावती शिक्षक मतदारसंघात नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.