Breaking News

अखेर कीतीदिवस सोसायची माणिकगड कंपनीची दबंगगिरी

Advertisements

आदिवासी “सोमा” ने केला जमिनीवर कब्जा

Advertisements

कोरपना ता.प्र./सै.मूम्ताज़ अली:-

Advertisements

कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यभागी मोठ्या डौलाने उभी असलेली माणिकगड सिमेंट कंपनीने मौजा नोकारी येथील सर्वे नं.१८/१ मधील ४ हेक्टर १७ आर जमिनीवर परवानगी शिवाय व बनावट कागदपत्राच्या आधारे खरीदी दाखवुन “सोमा भोजी आत्राम” सह ११ लोकांच्या जमिनी असाच पद्धतीने हस्तगत करून नियमबाह्य निवासी गाडे अकृषक परवानगी नसतानाही आदिवासी जमिनीवर अवैद्य बांधकाम केले. सदर प्रकरण सोमा आत्राम यांनी महसुली न्यायालयात दाखल करत सदर प्रकरणाची संपुर्ण चौकशी व पडताळणी करून तहसीलदारांनी पुनर्स्थापने बाबत नियम १९६९ अन्वय ३० सप्टेंबर २०२० रोजी आदेश पारीत करून ४ हेक्टर १७ आर जमीन प्रत्यार्पण करण्यात आली.

यामुळे सोमा आत्रामांनी नुकतेच जमिनीवर नागर घातले आणि शेती करत असताना माणिकगड सिमेंट कंपनीचे ३० ते ४० सुरक्षा रक्षकांनी अडवून मारझोड करण्याची धमकी देत लाठ्याकाठ्याने बळाचा वापर केला. वातावरण तापत असल्याचे पाहून गडचांदूर पोलीसांनी यावर वेळीच हस्तक्षेप करून तापत असलेले वातावरण शांत केले.कंपनीच्या मुजोरीमुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडले असून कुसुंबी नोकारीतील आदिवासींच्या जमीनी कंपनीने बळकावल्याचे प्रकरण सुरू आहे.मात्र कंपनीकडे जमिनीचे मालकी हक्का बाबत कोणतेही दस्तावेज नसताना आदिवासी कुटुंबांवर अन्याय करत असल्याचे प्रकार सतत घडत असल्यामुळे दिवसेंदिवस असंतोष वाढतच चालला आहे.तसेच ७ जुलै २०२० रोजी सार्वजनिक रस्ता खुला करण्याचा आदेश पारीत झाला असून कंपनीने आदेशाचे उल्लंघन करत रस्त्यावर गेट बसवल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.अशाप्रकारे अनेक प्रकरण पुढे येत असताना कंपनी मात्र “तो मी नव्हेच” ची भुमिका पार पाडत असून सुरक्षा रक्षकांच्या बळावर बिचाऱ्या आदिवासींना मारझोड व अडवणुक करण्याची धमकी देत असल्याची माहिती असून आदिवासी कुटुंबात भीती पसरली आहे.
कंपनीने दबंगगिरी करणे थांबवावे,सोमा आत्राम सह इतर ११ आदिवासी कुटुंब जमिनीपासून बेदखल झाल्याबद्दलचे प्रकरण सुरू असून कंपनीने आदिवासींचा छळ थांबविण्याचा इशारा जनसत्याग्रह संघटना अध्यक्ष सैय्यद आबीद अली,भाऊराव कन्नाके, मारोती वेडमे,केशव कुळमेथे,भीमराव मेश्राम, परशुराम आत्राम,जैराम कुळमेथे,ताराबाई कुळमेथे यांनी दिला आहे.सोमा आत्राम यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कंपनीच्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून अखेर कीतीदिवस सोसायची माणिकगड सिमेंट कंपनीची दबंगगिरी असा प्रश्न अन्याग्रस्त आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भाला अर्थसंकल्पात काय मिळाले?निव्वळ घोषणा?

महायुती सरकारच्या निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पात विदर्भासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी १०० …

झाडावर उलटे टांगून माकडावर अत्याचार : कारवाईची मागणी

माकड हा मानवाचा पूर्वज असल्याचा दाखला दिला जातोय. तसेच अनेकदा माकडांच्या मर्कटलिलांना मनुष्यप्राणी वैतागतात. मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *