Breaking News

धणोजे कुणबी समाजाचे मुंबईत वसतीगृह तयार

गरजुंना मिळणार लाभ : राज्याच्या राजधानीत कुणबी समाजाचे पाऊल
चंद्रपूर : धनोजे कुणबी समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई राहण्याची व्यवस्था व्हावी, त्यांची भविष्यातील पुढील वाटचाल सोपी व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबईत वसतीगृह तसेच राहण्याच्या व्यवस्थेसाठी धनोजे कुणबी विकास संस्थेने एक ध्येय डोळ्यासोर ठेवले. या ध्येयासाठी समाजबांधवांची मोठी मदत झाली. याच मदतीच्या भरोवश्यावर आता पनवेल, महामार्गाच्या अगदी जवळ असलेले रेल्वे स्टेशन, न्यू मुंबई विमानतळ येथे वसतिगृहासाठी नवीन वसतीगृह ससमाजबांधवांनी साकार केले आहे. यासाठी मुंबई, पुणे व्यतिरिक्त  विदर्भाच्या सगळ्या जिल्ह्यातील तसेच विदेशातील  समाजबांधवांनी आर्थिक मदत करून कुणबी समाजाचा स्वप्न साकार केले आहे. आता पुढील कामासाठीही समाजबांधवांची अशाच मदतीची गरज असल्याचे मत संस्थेचे संकल्पक  खजिनदार प्रशांत आगलावे  व सचिव दत्तू पावडे तसेच अन्य सदस्यांनी व्यक्त केले.
समाजातील एमपीएससी, युपीएससीमध्ये तरुणांचा टक्का अगदीच कमी आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याची सध्यातरी गरज आहे. शिक्षणाची इच्छा असूनही समाजातील अनेक तरुण मुंबईत जात नाही. त्यामळेच मुंबईत स्थायिक झालेल्या बांधवांनी आपल्या गावखेड्यातील बांधवांना मुंबईत आणण्यासाठी धडपड सुरु केली आहे. मुंबई येथील पनवेल, महामार्गाच्या अगदी जवळ असलेले रेल्वे स्टेशन, न्यू मुंबई विमानतळ येथे वसतिगृहासाठी नवीन फ्लॅटचा ताबा आता धणोजे कुणबी विकास संस्थेला मिळाला आहे. या माध्यमातून समाजाची हक्काची जागा आता मुंबईत झाली आहे. धनोजे कुणबी समाज संस्थेने ‌मुंबईत विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था केली असून स्वप्न साकार झाले आहे. मात्र आणखी समाजबांधवांनी समोर येवून मदत करणे गरजेचे आहे. संस्थेच्या खात्यात जमा झालेला प्रत्येक पैसा केवळ निश्‍चित उद्देशासाठीच वापरला जात आहे, समाजाचे मुंबईत वसतीगृह साकार होत आहे, हे आपल्या समाजासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे, असे मत
धणोजे कुणबी विकास संस्थेचे खजिनदार प्रशांत आगलावे, सचिव दत्तू पावडे, अध्यक्षा करिष्मा दुर्गे, जल संपदा विभागाचे अव्वल सचिव विलास राजुरकर, महादेव पिंपळकर, अरूण गोहोकार, अभय अतकरे, माधुरी ऊरकुडे, उल्हास ठाकरे, मोनाली बदकी, अक्षय बोथले, कृष्णा  कानफाडे, प्रभाकर दिवसे आदींनी केले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपूरकर रसिकांना दोन दिवसीय नाट्य मेजवानी

शुक्रवारपासून महावितरणची राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा नागपूर, दि. 6 जुलै 2024:- महावितरणच्या आंतर प्रादेशिक विभाग राज्य नाट्य स्पर्धा नागपूर परिमंडलाच्या यजमान …

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *