Breaking News

संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता.

Advertisements
(जमशेदजी नसरवानजी टाटा ३ मार्च, इ.स. १८३९ जयंतीनिमित्त विशेष लेख)
मेरे बापका सपना देश का सब हो अपना ही वृत्ती आज देशात राजकीय नेत्यांना हाताशी धरून सरकारी कंपन्या बलकावण्याचा धंदा जोरात सुरू आहे. देशातील नागरिकांचे शोषण कसे करता येईल यासाठीच योजना आखली जात आहे. त्यामुळे देशाची संपत्ती कशी लुटता येईल या विशिष्ट धेय्यने प्रेरित होऊन काम करणारी दरोडेखोरांनी टोळी सर्व क्षेत्रात धुमाकूळ घालत आहे. भ्रष्ट उद्योगपतीने देशासाठी काय केले व काय दिले हा इतिहास लिहण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा कलम कसाई पुढे येऊन काय काय लिहतील.जमशेदजी नसरवानजी टाटा यांनी देशातील नागरिकांना सेवा देण्यासाठी काय काय निर्मिती केली त्यावर जास्त लिहल्या जात नाही.
कारण विज्ञानाच्या तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी त्याकाळी केला जेव्हा जातीव्यवस्था वर्णव्यवस्था भक्कमपणे उभी होती.म्हणूनच संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्धेश कधीच नव्हता.
मुंबईत पहिली वीज निर्मिती पुरवठा कोणी केला हा इतिहास माहिती आहे काय?. आपण मुंबई पुणे रेल्वेने प्रवास करतांना खोपोली जवळ मोठमोठे पाइप खाली गेलेले पाहतो, ते काय आहेत व त्यामागची कथा माहिती दिल्या जात नाही.नुसेरवान टाटा आपला मुलगा जमशेट व कुटुंबासह नवसारीहून व्यवसाय करण्याकरिता मुंबई येथे १८४७ साली आले. तेव्हां जमशेट ८ वर्षांचा होता. दूरदृष्टी हा टाटा घराण्याचा वारसाच, पुढे नागरिकांना कशाची गरज पडेल, यासाठी काय केले पाहीजे हे त्यांना फार आधीच कळत होते. कारण संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता.
१९०२ च्या नोव्हेंबर मधे जमशेटजी टाटा लॉर्ड हँमिल्टन यांना वळवण वीज प्रकल्पाचा प्रस्ताव घेऊन भेटले. मुंबई ची विजेची वाढती मागणी,गरज या सर्वाचा यांत विचार केला होता. परंतु या प्रस्तावास परवानगी मिळून काम चालू करण्यांस १९१० साल उजाडले. १९१० साली जमशेटजींनी २ कोटी रूपये भांडवल उभे करून फेब्रुवारी १९११ ला कामाला सुरवात केली. ७ फूट व्यासाच्या पाइप मधून खंडाळा, लोणावळा येथे पडणारे तुफान पावसाचे पाणी १८०० फूट ऊंचीवरून खाली खोपोली येथे ७ पाइप लाइन टाकुन आणायचे, तेथे जनित्राद्वारे विज निर्माण करावयाची व ती मुंबईला पोहोचवायची अशी ही योजना होती. त्याकरता वळवण येथे दोन धरणे बांधून पाणीसाठा वाढवायचा की जेणेकरून वर्षभर विज निर्मिती चालु राहील असी योजना त्यांनी आखली होती.
त्यांची सुरवात १९११ मध्ये झाल्यावर दुसऱ्याच दिवशी ७ हजार मजुर खंडाळा-लोणावळ्याच्या डोंगरदऱ्यांत रात्रंदिवस कामाला लागले. सरळ सुळके,गर्द झाडी यातुन पाइप वर चढवणे, उतरवणे, परत योग्य जागी जोडणे असे सर्व उच्च दर्जाचे काम चालु झाले. १९११ साली केलेल्या या कामांत आजही कोठे गळती नाही, की कोणताही पाइप फुटला नाही. प्रचंड वेगाने कित्येक वर्षे या पाइपातुन पाणी येत आहे व विज निर्मिती होत आहे. हे पाइप जर्मनीहून आणले होते, जनित्राची चक्रे स्वित्झर्लडहून आणली होती, जनित्र अमेरिकेहून, विज वाहुन नेणाऱ्या तारा इंग्लडहून आणल्या. हे सर्व टाटा कंपनीच्या लोकांनी ४ वर्षात पुर्ण केले. १९१५ मधे लॉर्ड विलींग्टन यांनी खोपोलीत कळ दाबल्यानंतर मुंबईच्या सिप्लेक्स गिरणीत दिवे लागले. १९११ साली दळणवळणाची साधने, उपजत टेक्नॉलॉजी, परिस्थिती, कम्युनिकेशनच्या सोयी या सर्वांचा विचार केला तर ह्या अफाट कामाची व दूरदृष्टीची टाटांची समज किती मोठी होती हे लक्षात येते.संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता.आजच्या उद्योगपती कडे पाहिल्यावर लक्षात आले पाहिजे.
“टाटा” ही भारतीयांसाठी केवळ दोन अक्षरे नाहीत. संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता उलट समाजाकडून आलेले पैसे समाजालाच परत करावयाचे हे त्यांचे धोरण होते. देशभक्ती टाटांच्या रोमारोमात मुरलेली होता. जे जे उदात्त, उत्तम आहे ते ते मी या देशासाठी घडवीन असा ध्येयवाद त्यांच्या कुटुंबात होता. पैशाची उधळपट्टी नाही, भपका नाही, सवंग प्रसिद्धी नाही पण कर्तव्य आणी गुणवत्ता यात सर्वोच्च असण्याची उत्तुंग ध्येय काल पण होती आणि आज पण आहेत.
२६/११ च्या हल्ल्यानंतर त्यासाठी जबाबदार असणाऱ्या पाकिस्तानबरोबर त्यांनी व्यापार बंद केला. वाटेल ती किंमत देऊन टाटांच्या गाड्या खरेदी करण्यास आलेल्या पाकिस्तानी राजदूताला टाटा नी हुसकावून लावले.आज चे उद्योगपती कमिशन मिळत असेलतर काही ही करायला तयार आहेत.
जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ – १९ मे, इ.स. १९०४) पारशी समाजाचे भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये आहेत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. 
टाटांना “भारतीय उद्योगाचे जनक” म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशात ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते.ते जर ब्राम्हण बनिय असते तर भारतीय संस्कृती रक्षकांनी चॅनल प्रिंट मीडियाने चोवीस तास त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम दाखविले असते.
त्यांनी देशाची अर्थव्यवस्था निर्भीड निःपक्षपाती निर्माण केली.भारतीय नागरिकांना विश्वासपात्र सेवा देण्याची त्यांची जबाबदारी देशभक्त म्हणून पार पाडली. शिक्षण आरोग्य यावर त्यांनी विशेष भर दिला.कामगार,कर्मचारी यांच्या मुलामुलींना विशेष सवलत देऊन प्रशिक्षण देऊन कायमस्वरूपी नोकरी दिली असा भारतीय उद्योग क्षेत्रात पितामह जमशेदजी टाटा यांच्या ३ मार्च जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना ध्येययानां कोटी कोटी प्रणाम आणि  भारतातील सर्व उद्योग क्षेत्रातील कामगारांना हार्दिक शुभेच्छा.
 
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,
टाटा पॉवर कंपनी कर्मचारी मुंबई
Advertisements

About Vishwbharat

Check Also

राज ठाकरेंनी दिला BJP ला पाठिंबा

मला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर अमित शाह यांच्या भेटीनंतर काही होत नाही त्यांना लक्षात …

काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. राजू पारवे हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *