कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नांदाफाटा परिसरात मागील
३ वर्षांपासून मोठ्याप्रमाणात अवैध सट्टापट्टी घेतली जात असून येथील “अण्णा” नामक व्यक्ती सध्या सट्टा किंग बनल्याची चर्चा ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.या व्यक्तीने येथील बाजारपेठेत चक्क एक दुकान भाडे तत्त्वावर घेत,कर्मचारी ठेवून खुलेआम सट्टापट्टीचा व्यवसाय अशाप्रकारे सुरू केला आहे जणू याला शासन परवानाच मिळाला की काय अशी शंका सर्वसामान्यात वर्तवली जात असून कोणीही माझा व्यवसाय बंद करू शकत नसल्याची भाषा बोलणाऱ्या या अण्णाला काही पोलीस
व राजकीय नेत्यांचा पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.
एकेकाळी सट्टापट्टी खेळण्याच्या नादात उध्वस्त झालेला हा अण्णा,हल्ली मात्र नांदाफाटा परिसरात सट्टा किंग बनला आहे. “सट्टापट्टी,दारूविक्री इतर अवैध धंदे कायमचे हद्दपार करू” असे आश्वासन देण्यात आले होते मात्र परिस्थिती जैसे थेच असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.पोलीस अधिकारी यांच्या नजरे आड तर हा प्रकार घडत नसेल ना ! अशी शंका असून झटपट श्रीमंत होण्याच्या हौसेपोटी या औद्योगिक प
रिसरातील कित्येक गोरगरीब,मजूर मोठ्याप्रमाणात सट्टेच्या नादी लागल्याचे चित्र आहे.परिणामी यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे.”आज गेम लागेल,उद्या लागेल” या आशेवर आजही मोठ्याप्रमाणात सट्टापट्टी खेळली जात आहे.ही शोकांतिका असून कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.