गणेश मंडळांना मनपातर्फे धनादेशाचे वितरण
प्रबोधनपर स्थायी देखावे सजावट स्पर्धा २०१९
चे बक्षीस वितरण.
चंद्रपूर ५ मार्च – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्यावतीने पर्यावरणपूरक गणेशत्सवांतर्गत प्रबोधनपर स्थायी देखावे सजावट स्पर्धा २०१९ मध्ये प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळविणाऱ्या गणेश मंडळांना बक्षिसरुपी धनादेश आज मा. महापौर सौ राखी संचय कंचर्लावार यांच्या हस्ते आज महापौर कक्षात देण्यात आला.
पर्यावरणपुरक गणेशोत्सवास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मनपातर्फे प्लास्टिकमुक्त अभियान / प्लास्टिकचे दुष्परिणाम, स्वच्छ महाराष्ट्र अभियान ( कचरा विलीगीकरण ) व रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयांवर प्रबोधनपर स्थायी देखावे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रबोधनपर स्थायी देखावे तयार करणाऱ्या सादर करणाऱ्या गणेशमंडळांना विशेष बक्षिस मनपातर्फे देण्यात येणार होते.
रेन वॉटर हार्वेस्टिंग काळाची गरज या पर्यावरणपूरक व सामाजिक संदेश देणाऱ्या विषयावर प्रबोधनपर स्थायी देखावा तयार करणाऱ्या नवयुवक बाल गणेश मंडळ दत्तनगर यांना १५,०००/- रुपयांच्या धनादेशाचे प्रथम पारितोषिक तर १०,०००/- रुपयांचे दुसरे पारितोषिक ‘ प्लास्टिक प्रदूषणावर मात करा ‘ देखावा दर्शविणाऱ्या तुकुम येथील हनुमाननगर गणेश मंडळ यांना मा. महापौर यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी स्थायी समिती सभापती श्री. रवी आसवानी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, देवानंद वाढई, विशाल निंबाळकर, सचिन भोयर, नवयुवक बाल गणेश मंडळ व हनुमाननगर गणेश मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Check Also
१५ प्रवासी…भरधाव ट्रॅव्हल व ट्रकची समोरासमोर भीषण धडक
प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व हायवा ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत २ जण गंभीर जखमी तर …
रुग्णालयात आग : नर्सची हायकोर्टात याचिका
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा दूर्वैवी …