सिध्दबली इस्पात लिमी च्या पूर्व कामगार व बाधित गांवातील स्थानिकांना रोजगारांत प्राधान्य देण्यासाठी दि. 21 मार्च रोजी प्रवेषद्वारासमोर आंदोलन – हंसराज अहीर,
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री त्या मृत कामगाराच्या मृत्यू ची चौकशी व्हावी व परिवाराला आर्थिक मोबदला त्वरित मिळावा – हंसराज अहीर
चंद्रपूर- चंद्रपूर जिल्हयातील औद्योगीक ओळख असलेल्या ताडाळी एमआयडीसी येथे अनेक उद्योगांची रेलचेल असतांनाही आज या उद्योगांमध्ये स्थानिक लगतच्या गावातील युवकांच्या रोजगार हक्काचे उद्योगांकडून हनन करण्यात येत आहे सोबतच ग्रामवासी या उद्योग प्रदूषणाचा फटका सहन करित असतांनाही या गावांमध्ये कवडीचाही विकास निधी देत नसल्याने या सर्व बाधीत गावांतील गावक-यांनी संघटीतपणे आंदोलन उभे करून वर्तमान व भावी पिढीला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित आंदोलन करण्याची गरज असल्याने सदर आंदोलनासाठी ताडाळी ग्रोथ सेंटर स्थानिक व प्रकल्पग्रस्त संघर्श समितीची स्थापन करणार असल्याची माहिती पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. स्थानिक शनी मंदीर सभागृहात आयोजित ताडाळी एमआयडीसी स्थित उद्योग बाधीत गावांतील गावक-यांच्या बैठकीस हंसराज अहीर संबोधीत होते. या बैठकीला भाजप जिल्हा महामंत्री राजेश मुन, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजप महानगर महामंत्री तथा जि. प सदस्य ब्रिजभूषण पाझारे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, जि. प. सदस्य रणजित सोयाम, निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, अनिल डोंगरे, विजय आग्रे, येरुर चे सरपंच मनोज आमटे, नकोडा चे सरपंच किरण बांदूरकर, सोनेगाव चे सरपंच संजय उकिनकर, पडोली ग्रामपंचायत सदस्य विक्की लाडसे, पंढरीनाथ पिंपळशेंडे, शोभाताई पिदूरकर, विनोद खेवले, रामू बल्की, आशिष वाढई, सोनेगांव, येरूर, मोरवा, पडोली, पांढरकवडा, शेनगांव, वढा, अंतुर्ला, साखरवाही, नागाळा, वांढरी, धानोरा, ताडाळी, बेलसनी, चिंचाळा आदी गावांतील प्रतिनिधींची उपस्थिती होती. एमआयडीसी येथील काही उद्योगांनी आपली मनमानी कारभार सुरू केला असून त्यांच्यातील मानवीय दृष्टिकोन व भावना संपुष्टात आली असल्याची तीव्र भावना यावेळी अहीर यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी सिध्दबली ईस्पात लिमी. येथे मध्यप्रदेश निवासी कामगाराचा मृत्यू झाला मात्र उद्योग मालकाने सदर कामगाराच्या पार्थीवाची विल्हेवाट लावण्याच्या विकृत मानसिकतेतून नागपूर ला रवाना केले होते मात्र अद्यापही या उद्योग मालक व व्यवस्थापनाने मृत कामगाराच्या परिवाराला आर्थिक मोबदला दिलेला नाही. पुर्वीच्या कामगारांची सिध्दबलीच्या उद्योग मालकाकडून आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असतांना कामगाराची थकबाकी वर्षांपासून दिलेले नाही तसेच त्यांचे न्याय अधिकार असलेली रोजगार संधी सुध्दा देण्यात आली नाही. उद्योग मालकाचे हे वर्तन माणुसकीस काळीमा फासणारी आहे. येत्या 21 मार्च रोजी त्या परप्रांतीय कामगाराच्या मृत्यु ला एक महिना होत असल्याने या मृत कामगाराच्या परिवाराला आर्थिक मोबदला, पूर्व कामगारांचे देय व रोजगार अदा करण्याच्या मागणीला घेत या सर्व गावांतील गावक-यांना घेवून सिध्दबली ईस्पात च्या गेट समोर आंदोलन करून भविष्यात उद्योगाला टाळा लावून बंद करण्याचा निर्धार घेणार असल्याचा संकल्प यावेळी हंसराज अहीर यांनी गावक-यांसोबत व्यक्त केला. एमआयडीसी येथील उद्योगांच्या माध्यमातून लगतच्या गावांतील युवकांना प्रषिक्षण उपक्रम राबविल्या जावेत ज्यातून उद्योग व्यवस्थापन व तांत्रिक कौशल्याची संपूर्ण माहिती देत रोजगार दयावे, उद्योग प्रदुशणाने प्रभावीत शेतक-यांना शेती उत्पादनाचा मोबदला दयावा, गावांतील अनेक शेतक-यांनी स्वतःची कर्मभुमी असलेली शेतजमीन या उद्योेग मालकांना सुपूर्द केली मात्र या भोळयाभाबळया शेतक-यांना कवडीमोलाचा भाव देत अन्याय करण्यात आला असल्याने प्रत्येक प्रकल्पग्रस्त परिवारातील सदस्यांना कायमस्वरूपी रोजगार तात्काळ प्रदान करावे, या प्रकल्पबाधीत तसेच प्रदुषन सहन करणा-या गावांमध्ये ताडाळी एमआयडीसी येथील सर्व उद्योगांनी विशेष वार्षिक विकास निधी उपलब्ध करून दयावा अशा मागण्यांना घेवून या उद्योगांविरोधात आंदोलन उभं करणार असल्याची माहिती यावेळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या बैठकीच्या माध्यमातून दिली. सर्व उद्योगांनी सुरक्षा उपायांमध्ये वाढ करावी यापुढे कुठलीही जिवीतहानी अथवा कामगार जखमी झाल्यास खपवून घेतल्या जाणार नाही अशी तंबीही अहीर यांनी दिली