Breaking News

गत 24 तासात 42 कोरोनामुक्त ; 86 पॉझिटिव्ह

Advertisements


चंद्रपूर, दि. 7 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 42 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 86 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 202 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 170 झाली आहे. सध्या 632 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 22 हजार 583 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 96 हजार 244 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 400 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 362, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 86 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 19, चंद्रपूर तालुक्यातील दोन, बल्लारपूर तीन, भद्रावती पाच, ब्रम्हपुरी तीन, सिंदेवाही दोन, मुल 10, राजूरा एक, वरोरा 40 व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

झाडावर उलटे टांगून माकडावर अत्याचार : कारवाईची मागणी

माकड हा मानवाचा पूर्वज असल्याचा दाखला दिला जातोय. तसेच अनेकदा माकडांच्या मर्कटलिलांना मनुष्यप्राणी वैतागतात. मात्र …

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *