Breaking News

घुग्घुस येथील व्यवसायिकांचा भाजपात प्रवेश,घुग्घुस शहराचा विकासात भाजपाचे योगदान बघून भाजपात प्रवेश- देवराव भोंगळे

घुग्घुस येथील व्यवसायिकांचा भाजपात प्रवेश
घुग्घुस शहराचा विकासात भाजपाचे योगदान बघून भाजपात प्रवेश- देवराव भोंगळे
घुग्घुस( प्रभाकर कुम्मरी) – घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात मनोज ठेपाले, बालाजी बाशेट्टीवार, विकास निखाडे, पुरुषोत्तम भोयर यांनी भाजपात प्रवेश घेतला.
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून स्वागत केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले घुग्गुस शहराच्या विकासात भाजपाने योगदान दिले सामाजिक उपक्रम राबवून विकासाला चालना दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांच्या नेतृवावर विश्वास ठेवून विकास व सामाजिक सेवेचे चांगले काम बघून या तरुणांनी भाजपात प्रवेश घेतला. त्यांचे मी भाजपा परिवारात स्वागत करतो असे ते म्हणाले. प्रवेश घेणाऱ्या व्यवसायिक म्हणाले भविष्यात तरुण कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश करून पक्षाला बळकटी देण्याचे काम आम्ही करणार असे असे ते म्हणाले.
यावेळी भाजपा युवमोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोबडे, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, भाजपा नेते हेमंत उरकुडे, शरद गेडाम, धनराज पारखी, तुलसीदास ढवस, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, दिलीप कांबळे, सतीश कामतवार, मंगेश पचारे, प्रकाश पचारे, नितीन कटारे, अतुल चोखाद्रे, निरंजन नगराळे उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *