घुग्घुस(प्रभाकर कुम्मरी)-आज दि. 13 मार्च 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी लाँयडस मेटल एनर्जी लिमिटेड कंपनीला निवेदन सादर करुन हे स्मरण करून दिले कि संदर्भ क्रमांक 09, दिनांक 08/6/2019, संदर्भ क्रमांक 06,दिनांक* *11/6/2019, संदर्भ क्रमांक 14, दिनांक 11/7/2019 रोजी निवेदन देण्यात आले होते पंरतु या कंपनीने स्वतःच्या होणाऱ्या प्रदुषणाबाबत अद्याप कोणतेही नियंत्रणे व पाऊल उचलले नाही घुग्घुस गाववासियांना शुध्द वायू मिळणे या कारखान्यामुळे व खदानीमुळे खुप मोठे अवघड झालेले आहे आता जर या लाँयडस मेटल कंपनीमुळे होणारे प्रदूषणावर दहा ते पंधरा दिवसाचा आता जर नियंत्रणे लावून प्रदुषण थांबविले नाही तर आम्ही बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चा माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष BRSP माननीय अँड. डॉ. सुरेश माने सरांचा मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन* *करणार असा इशारा देण्यात आला या प्रदुषणामुळे गावातील लोकांना टि. बी. दमा,खोकला, कॅन्सर, त्वचारोग, डोळ्याचे आजार, असा अनेक रोगांचा सामना आज संपूर्ण घुग्घुस वासी करत आहे तरी लवकरात लवकर हे प्रदुषण थांबवावे, व रोज सकाळी दुपार सायंकाळी तीन ते चार वेळेस LLOYD Matel ते चंद्रपूर रोड वरील चौधरी पेट्रोल पंप, व बस स्टॉप ते राजीव रतन हॉस्पिटल पर्यंत पाणी मारण्यात यावे.*
*असे निवेदन सादर करताना जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव, विधानसभा उपाध्यक्ष योगेश नगराळे, घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव, घुग्घुस शहर उपाध्यक्ष मायाताई सांड्रावार, युवा अध्यक्ष ईश्वर युवा उपाध्यक्ष दीपक दिप, बेले, महिला आघाडी अध्यक्षा रमाबाई सातारडे, भाग्यश्रीताई भगत, जोशनाताई डांगे, भावनाताई कांबळे, पारिखाताई कांबळे, रिनाताई निखाडे, इरफान पठाण, सचिन माहुरे, राकेश कातकर, आदित्य सिंह, विलास पचारे, रवी निखाडे, सोनु फुलकर, सागर बिराडे, राकेश पारशिवे, करण कारबांदे, अनुप नळे, आशिष कावळे, व समस्त BRSP घुग्घुस टिम उपस्थित होती*
” “