Breaking News

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती ईआर-1 सादर करा

Advertisements

चंद्रपूर दि. 24 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय निमशासकीय, तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापणांना  त्यांच्या आस्थापणेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष /स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस, विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट़्र शासन कौशल्य विकास, रोजगार व अद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in. या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.

Advertisements

त्यानुसार मार्च 2021 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर -1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम महाराष्ट़्र शासन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन ,पहीला माळा, हॉल क्र. 5/6चंद्रपूर या कार्यालयाद्वारे ऑनलाईन पध्दतीने सुरू असून या सर्व आस्थापणांनाकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यास्तव, या सर्व आस्थापणांना या कार्यालयाकडून यापूर्वीच युझर नेम व पासवर्ड देण्यांत आलेले आहेतच. त्याचा वापर करुन प्रत्यकाने  www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करावे व आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी .

Advertisements

सदरील मार्च 2021 अखेरचे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची  अंतिम तारीख 30 एप्रिल 2021 ही आहे ,याची सर्व आस्थापणांनी नोंद घ्यावी व हे तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करुन सहकार्य करावे, तद्तच प्रत्येक आस्थापणेने आपला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व अद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.

या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास, ई-मेल आयडी chandrapurrojgar@gmail.com/asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलसह संपर्क साधल्यास,  सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी कळविले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *