Advertisements
ग्रामपंचायत येवती येथे आयुर्जल शुद्ध जल केंद्राचे उद्घाटन
वरोरा। (आलेख रट्टे)

पंचायत समिती वरोरा अंतर्गत येवती इथे फ्लोराईड मुक्त पाण्याचा आयुर्जल शुद्ध जल केंद्राची उभारणी नटराज निकेतन संस्था, मैत्री परिवार संस्था तसेच समविद इंटरनॉशनल आणि हलदिराम फुड्स यांच्या संयुक्त विद्माने healthy water, healthy life या उपक्रमाद्वारे करण्यात आली, येवती गावामध्ये पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे येथिल लोकांना दातांचे आजार, सांधे दुखणे, हाडा संबंधी त्वचा रोगाचे आजार आढळले. डॉ. विनोदभाऊ निकुरे यांनी वरिष्ठ संस्थेची संपर्क साधुन पाण्याची टेस्ट केली असता पाण्यामधील टि. डी. एस. व हार्डनेस चे प्रमाण जास्त आढळले. गावामध्ये स्वच्छ आणि स्वास्थ वर्धक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी उपाय योजना केली जात आहे. या उपक्रमाअंतर्गत विर्दभातील तिसरा व चंद्रपूर जिल्हातील पहिला प्लॉट या फ्लोराईड युक्त गावामध्ये स्वास्थ वर्धक आयुर्जल शुद्ध जल केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या प्लॉटचे वैशिष्टय म्हणजे zero wastage technology प्लॉट या प्लॉटमधुन एकही थेंब पाणी वाया जात नाही. यात थंड पाणी लोकांना मिळतं.या प्लॉटचे उद्घाटन मैत्री परिवार संस्थाचे अध्यक्ष मा. श्री. संजयजी भेंडे सर, मा. श्री. गिरिशजी बारसागडे साहेब कार्यकारी अभियंता ग्रामिण पाणीपुरवठा चंद्रपूर नटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्ष सौ. मंगलाताई पत्रिकर, श्री. विलासराव पत्रिकर, मैत्री परिवार संस्थेचे विस्वसत श्री. चंदुजी पेंडके, समविद इंटरनॉशनलचे डॉरेक्टर डॉ. मुकुंदजी पत्रिकर, श्री. हितेश बांबोडे कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा वरोरा, प्रमोदजी पेंडके, निखिलजी व्यास, मधुरा व्यास व हर्षद पत्रिकर यांचे प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पळला त्यावेळी येवती येथील सरपंच पवन पिजदुरकर, उपसरपंच पतीतपावन मेश्राम, ग्रा. पं. सदस्य हर्षद ढोके, सौ. वंदना निकुरे, सौ. उषाताई गेडाम,सौ. पौर्णिमा उरकांडे, सौ. संगिता पवार,सौ.कलिंदा मेश्राम,श्री. मिथुनजी ठाकरे,डॉ. विनोदभाऊ निकुरे,गुलाबराव आसुटकर,घनश्याम बरडे,अंबादासजी टोंगे,सुधाकरावजी पिजदुरकर, ओंकेश्वर टोंगे,श्री.अमोलजी बदखल(सचिव), बाबाराव पेटकुले, भानुदास निकुरे, मधुकराव निकुरे, मधुकराव गेडाम, झित्रुपाटिल ढोके, लक्षमणरावजी धांडे, नामदेवराव कोयचाडे, भैय्याजी कोयचाडे, निलेश पेटकुले, प्रकाश लोखंडे, सुधाकर गेडाम, संजयराव उरकांडे, मोरेश्वर वाढयी, विठ्ठलराव वाढयी, बापुरावजी मेश्राम, प्रदिपराव हपरे, डोमेक्षवर मोहुले, शेषरावजी निकुरे शिक्षक, सुयोग ढोके सर व असंख्य येवती ग्रामवासी उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन डॉ. विनोदभाऊ निकुरे माजी सरपंच यांनी केले.
Advertisements