वर्धा : एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे आर्वी तालुक्यातील पांजरा व बोथली या गावामध्ये जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला .यामध्ये प्रथम पांजरा येथे लहान मुलांनी गावामध्ये रॅली काढून पाणी वाचवण्याबाबत जनजागृती केली, यामध्ये पाणी बचतीबाबत नारे देण्यात आले. नन्तर मुलांना पाणी बचतीबाबत महत्व पटवून देण्यात आले. नन्तर बोथली या गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला .यामध्ये दोहा वर पीक घेणाऱ्या लाभार्थ्यांसोबत बैठक घेण्यात आली . व महत्व पटवून देण्यात आले . यामध्ये कोव्हीड 19 च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.याकरिता समाज कार्यकर्ते श्री रवींद्र तांदूळकर ,व मंगेश पांडे यांनी परिश्रम घेतले.