पाच अट्टल आरोपींना अटक
– सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकींसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
– रामनगर पोलिसांची कारवाई
चंद्रपूर-
दुर्गापूर व रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी करणार्या पाच अट्टल आरोपींना रामनगर ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सोन्या-चांदीच्या दागिने, तीन मोटारसायकल असा एकूण 2 लाख 1 हजाराचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार, 24 मार्च रोजी केली गेली.रूप उर्फ अबिर सोम दत्त (19, रा. मेजर गेट, तुकुम), यश रवींद्र फुलझेले (21,पडोची चौक), विकास दशरथ भोयरवार (19, रा. बंगाली कॅम्प, चंद्रपूर), चिराग जयंत आत्राम(20 रा. सोमनाथ रोड, मुल), वैभव रामदास गाडगे (19, रा. गोंडसावरी, ता. मुल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
आरोपींकडून 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, सोन्याचे मंगळसुत्र, गुन्ह्यात वापरलेली तीन मोटारसायकल, रोकड असा एकूण 2 लाख 1 हजार 440 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर, ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अब्दुल मलिक, एकरे यांच्या पथकाने केली.
Check Also
गोंदिया विमानतळावरून इंदूर,दिल्ली,बंगळुरू विमानसेवा
गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबर …
बनावटी और झूठे आंसुओं का पर्दाफाश : ‘कातिल’ पत्नी गिरफ्तार
बनावटी और झूठे आंसुओं का पर्दाफाश : ‘कातिल’ पत्नी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …