भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले
सावली-
तालुक्यातील व्याहाड (बुज) बसस्थानकाच्या काही अंतरावर असलेल्या वाघोली बुटी फाट्यावर एका भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास जबर धडक मारली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. ट्रक वेगात होता. दुचाकीस्वार या कंटेनरच्या मागील भागात सापडला त्याच्या अंगावरून कंटेनरचे चाक गेले. मृताची अद्याप ओळख पटली नाही. घटनेचा तपास सावली पोलिस करीत असून, घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले
Advertisements
Advertisements
Advertisements
विश्वभारत News Website