Breaking News

चंद्रपूर शहर महानगरपालिका राबविणार हीट ॲक्शन प्लॅन २०२१

Advertisements

चंद्रपूर शहर महानगरपालिका राबविणार हीट ॲक्शन प्लॅन २०२१

Advertisements

 ( उष्माघात कृती आराखडा  )सिटी लेव्हल कमिटीची आढावा बैठक

Advertisements

चंद्रपूर १६ एप्रिल  – उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणारे उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा २०२१ राबविणार आहे. महाराष्ट्र्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी उष्णेतचा उच्चांक गाठणाऱ्या चंद्रपूर मनपा कार्यक्षेत्रात सन २०१५ पासुन उष्माघात कृती आराखडा चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येतो. याबाबत डॉ. आविष्कार खंडारे यांनी कृती आराखडा समितीचा आढावा घेतला.
कोव्हीड १९ च्या पार्श्वभुमीवर मनपा आरोग्य विभागामार्फत अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळेस पार पडण्यात येत आहेत. संपुर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना उपाययोजनांवर कार्य करीत असतांनाच ऐन उन्हाळ्यात तप्त उन्हामुळे नागरिक उष्माघाताला बळी पडू नये, यासाठी हीट ऍक्शन प्लॅन राबविणार येणार आहे. याकरीता १६ एप्रिल रोजी उष्माघात कृती आराखडा सिटी लेव्हल कमिटीच्या सर्व सदस्यांची बैठक आभासी माध्यमांद्वारे घेण्यात आली. याप्रसंगी डॉ. आविष्कार खंडारे यांनी सदस्यांना ‘ हिट ॲक्शन प्लॅन ’ संबंधी विस्तृत माहिती दिली.
बैठकीदरम्यान उष्माघात प्रतिबंधाबाबत व्यापक जनजागृती करणे, स्वयंसेवी संस्थां व चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे पिण्याच्या पाण्याच्या पाणपोईची जागोजागी उपलब्धता करणे, १०८ रुग्णवाहिकेचा सहभाग, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जनजागृतीबाबत सूचना केल्या.
याप्रसंगी सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, विद्या पाटील, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, मनपाच्या हीट ॲक्शन प्लॅन संबंधित शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शहरी प्रा.आ. केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. अश्विनी भारत, डॉ. योगेश्वरी गाडगे, डॉ. नयना उत्तरवार आभासी माध्यमांद्वारे उपस्थीत होते.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

मधुमेह [सुगर] नियंत्रण के लिए कारगर है आयरन विटामिन B-12

मधुमेह [सुगर] नियंत्रण के लिए कारगर है आयरन विटामिन B-12 टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नई …

आंखों की रोशनी बढ़ाने रामबाण है नमक-दालचीनी का पानी

आंखों की रोशनी बढ़ाने रामबाण है नमक-दालचीनी का पानी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   मथुरा। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *