Breaking News

कोव्हीड नियमांचे उल्लंघन,गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई

Advertisements

गोल बाजार परिसरात मनपाची कारवाई,कोव्हीड नियमांचे उल्लंघन

Advertisements

चंद्रपूर १२ एप्रिल – शासनाने आखुन दिलेल्या कोव्हीड नियमांचे पालन न करणाऱ्या श्री संताजी जगनाडे महाराज वस्तीगृह, सिटी मोबाईल शॉपी, गोपाल ट्रेडींग कंपनी, पाकिजा शॉपी, फॅशन क्वीन या प्रतिष्ठानांवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली असुन सर्वांना प्रत्येकी ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

Advertisements

    मनपा पथकामार्फत झोन क्र. 1 अंतर्गत पाहणी सुरु असताना  गोल बाजार , गांधी चौक  ते जटपूरा रोडवरील 4 दुकाने सुरु असल्याचे निदर्शनास आल्यामुळे  दुकान मालकास प्रत्येकी  रु. ५०००/- असे एकूण 20000/ रूपये दंड करण्यात आला. तसेच दुकान मालकांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.   तसेच झोन क्र. ३ अंतर्गत पाहणी सुरु असताना श्री संताजी जगनाडे महाराज वस्तीगृहात लग्न कार्य सुरु असल्याचे आढळून आले. या लग्न कार्यात ५० पेक्षा जास्त लोक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे श्री संताजी जगनाडे महाराज वस्तीगृहाचे व्यवस्थापकास रु. ५०००/- दंड करण्यात आला व त्यांना समज देण्यात आली.
कोरोना बाधीतांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत असून कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक काळजीपूर्वक व काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज असुन यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष अपेक्षित नाही असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.यावेळी यावेळी सहायक आयुक्त धनंजय सरनाईक ,विद्या पाटील,  सुरक्षा अधीकारी राहुल पंचबुद्धे व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *