Breaking News

साहेब,आम्हा बेरोजगारांना ५ हजार कधी देणार.,आमदारांना बेरोजगारांचा प्रश्न. 

Advertisements
युवकांचा जाहिरनामा २०१९,आमदारांना बेरोजगारांचा प्रश्न.  
(साहेब,आम्हा बेरोजगारांना ५ हजार कधी देणार.)
कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
     महाराष्ट्रात सन २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक पारपडली.चंद्रपूर जिल्ह्यातील इतर क्षेत्रा बरोबरच राजुरा विधानसभेत सुद्धा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली होती.काही अपक्ष तर काहींनी इतर पक्षांच्या उमेदवाराला समर्थन दिले होते.आता निवडणूक आली म्हणजे जाहीरनामे निघणारच यात दुमत नाही. याच पार्श्वभूमीवर भाजप,स्वतंत्र भारत पक्ष,गोंडवाना गणतंत्र पार्टी व इतर पक्ष,अपक्षांसह काँग्रेसने ही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.या निवडणुकीत राजुरा ७१ मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाआडीचे अधिकृत उमेदवार “सुभाष धोटे” यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत बाजी मारली आणि ते सध्या याक्षेत्राचे नेतृत्व करीत आहे.आमदार धोटे यांचे आजपर्यंत सर्व काही व्यवस्थीत सुरू असतानाच निवडणुकी दरम्यान आमदार धोटे यांचा फोटो असलेला “युवकांचा जाहिरनामा” अचानकपणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.या जाहिरनाम्यात “सुशिक्षित बेरोजगारांना रू.५००० दरमहा भत्ता, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी” असा आश्वानयुक्त मजकूर लिहिलेला आहे.सोबत सदर विधानसभेतील एका बेरोजगाराने यासंबंधीचा मॅसेज सोशल मीडियावर टाकून म्हटले आहे की “आम्हा बेरोजगारांना ५००० कधी देणार” अशी विचारणा आमदार सुभाष धोटे यांना केली आहे.
                ————-//————
मी हितेश गाडगे,राजुरा येथे राहतो,नशिबाने आपल्याच विधानसभेत साहेब,
  आमदार सुभाष धोटे साहेब यांच्या निवडणूक प्रचारात ज्या घोषणा झाल्या त्यापैकी एक महत्वाची घोषणा म्हणजे सुशिक्षित बेरोजगार यांना ५००० दरमहा भत्ता.
     “सुभाष धोटे साहेब आजपर्यंत सगळं उत्तम चालत होता,या कोरोनाच्या महामारीमुळे साहेब, आता आम्हां बेरोजगारावर प्रचंड अडचणीचे दिवस चालले आहेत,कृपया आपण शब्दाचे अगदी पक्के आहात,आपण दिलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी करकरीत रेष,आपण साहेब आम्हां बेरोजगारांना ५००० कधी देणार आहात कृपया सांगा,फार आर्थिक विवंचनेत अडकलोय हो आम्ही.”
“साहेब मार्ग काढा प्लिज.”
(आपलाच विधानसभेतील एक बेरोजगार.)
                   ———–//———
     “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे जेव्हा सकाळी,सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.तेव्हा यांनी केंद्र सरकारला राज्याचे ४० हजार कोटी परत करून तिजोरी रिकामी केली.असे केले नसते तर जरूर बेरोजगारांना रोजगार किंवा बेरोजगार भत्ता दिला असता.राज्य सरकारची आजही इच्छा आहे पण महाराष्ट्राचा जो पैसा आहे केंद्र सरकार देत नाही आहे.” अशी प्रतिक्रिया राजुरा विधानसभा सोशल मीडिया प्रमुख विक्रम येरणे यांनी “दै.चंद्रधून” ला दिली आहे.काही का असेना पण सदर मॅसेज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे हे मात्र विशेष.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *