Breaking News

जिल्हाधिकारी यांनी केली आॅक्सीजन प्लांटची पाहणी कोविड रुग्णांसाठी जादा आॅक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी यांनी केली आॅक्सीजन प्लांटची पाहणी
कोविड रुग्णांसाठी जादा आॅक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश
चंद्रपूर दि. 23 एप्रिल: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आज एम.आय.डी.सी. येथील आदित्य आॅक्सीजन प्लांटला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आॅक्सीजनचे किती उत्पादन होते आणि त्याचे वितरण कसे व कुठे कुठे होते याबाबत माहिती घेतली.
कोरोनाग्रस्त रुग्णांना आॅक्सीजनची मोठ्या प्रमाणात गरज असून आॅक्सीजनचा जास्तीत जास्त पुरवठा त्यांचेसाठी करण्यात यावा असे निर्देश त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. आॅक्सीजनची उत्पादन क्षमता वाढविण्यात यावी व यासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी त्यांना दिले.
यावेळी तहसीलदार निलेश गौड व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड हे उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

आंखों में रोशनी बढाने के लिए रामबाण है आंवला

आंखों में रोशनी बढाने के लिए रामबाण है आंवला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

वडिलांपेक्षा आई लवकर वयस्कर का दिसू लागते?

आई आणि वडिलांचे वय सारखेच असूनही आईच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसून येतात; पण असे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *