Breaking News

विश्वास नावाची गोळी व कोरोना..

विश्वास नावाची गोळी व कोरोना..

आजकाल कोरोना ने थैमान मांडला आहे..डाॅ. म्हणुन काही अनुभव मला आलेले आहेत.. ते मी इथे सांगत आहे..

काही रुग्णांचा सिटी स्कोर हा २१-२२ पर्यंत गेलेला होता.. व तब्बेत ढासळत होती.. पण नंतर ते लोक अचानक बरे होवु लागले.. आपोआप..
माझ्या निदर्शनास असे आले की ४-५ लोक जे मरणाच्या दारात होते ते बिना आॅक्सिजन , बिना हाॅस्पिटल ला जाता बरे झाले..
काही सांगितलेल्या गोळ्या व सकस आहार, पुरेशी झोप..
.. ह्या सर्वांमध्ये एक गोष्ट मला दिसली की ही सर्व लोक सकारात्मक होती.. भरपुर सकारात्मक.. ह्या लोकांचा हा विश्वास होता की ते बरे होणारच.. मला ह्यातुन बरे व्हायचच आहे..

व चमत्कार झाला.. ज्या लोकांना मानवी शरीर व त्याच्या क्षमता कळतात , त्यांच्यासाठी हे नवीन नाही..

असे कितीतरी न बरे होणारे आजार विश्वासाच्या बळावर बरे झालेले आहेत.. असे कितीतरी कॅन्सर पेशन्ट आहेत. की ज्यांना डाॅ नी सांगितल की म्रुत्यु समोरच्या ५-६ महीन्यात अटळ आहे..पण नंतर ६ महीन्यांनी चेक केल तर कॅन्सर चा नामोनिशान नव्हता..

प्रत्येक गोष्ट ही मानवी ज्ञानाच्या चौकटीतच बसेल अस नाही.. वैद्यकीय ज्ञानाला बरयाचश्या सिमा आहेत व त्यात बघितल तर मानवी शरीर आजही अनभिन्न आहेत..

मानवी शरीर स्वतःच एक डाॅक्टर आहे.. जगातला सर्वात मोठा व सर्वात उत्तम डाॅक्टर.. आपल्या शरीरात / आपल्या रक्तात एक अशी फौज असते की जी सतत कोणत्याही आजाराशी झगडत राहते.. हे वाचता वाचताच शरीराने लाखों विषाणु किंवा जिवाणुचा खात्मा केला असेल.. आपल्या शरीरात नेहमी केमिकल रिअॅक्शन सुरु राहतात.. जे आपण प्राणावायु नाकावाटे घेतो ते त्याच मुळ आहे.. ते नसानसात पोहोचत.. प्रत्येक पेशिला भेटत..
कमीत कमी 30,000,000,000,000 ( 30 लाख कोटी ) इतक्या पेशींना .. किंवा त्यापेक्षाही जास्त..

औषध नेमक काय करत.. एक तर ते ह्या शरीरात चालणारया केमिकल रीअॅक्शन ला कमी करते किंवा वाढवते. सगळ गणीत ह्या दोन गोष्टीवर चालत.. ते वेगळ अस स्वतःहुन काही करत नाही.. औषध अस वेगळी जादु करत नाही.. शेवटी जे करायच ते शरीर करत..

आपले विचार हे ह्या सगळ्या पेशिंवर राज्य करतात.. जर आपण मन आपण आनंदी केल तर आपोआप शरीरात चांगल्या केमिकल रीअॅक्शन घडुन येतात.. व आपल्याला चांगल वाटायला लागत..

जेव्हा चांगला विचार करतो , तेव्हा शरीरात हॅप्पी हाॅर्मोन स्त्रवतात व आपल्याला चांगला वाटत.. जेव्हा आपण वाईट विचार करतो किंवा घाबरतो तेव्हा एकदम त्याच्या विरुद्ध होत..

आपली रोगप्रतिकार शक्ती ही इतकी प्रभावी आहे…. व रोगप्रतिकार शक्ती व विचारांचा खुप जवळचा संबंध आहे.. ह्या कठीण वेळी आपण ह्या संबंधाचा कसा वापर करु शकतो हे महत्वाच आहे..
थोडक्यात सांगायच तर आपल शरीर अम्रुतही बनवु शकते व विषही.. आत्तापर्यंत कोणत्याच वैज्ञानिकांना हे गणीत पुर्णपणे समजलेले नाही.. जरी माणुस चंद्रावर जरी पोहोचला असला तरी तो मानवी शरीराचे गुढ रहस्य आहेत ,त्याच्या जवळपासही पोहोचलेला नाही..

तर कोरोनावर येतो..
१०० पैकी ९५ लोकांना काहीच होणार नाही.. पण नुसत्या भितीमुळे त्यांना लक्षणे दिसायला लागतिल.. कारण आपण जसा विचार केला तस आपल्या अंसख्य पेशी ला क्षणात खर वाटायला लागेल.. व तशी लक्षणे आपोआपच जाणवु लागतिल.. त्यामुळे जरी थोडा त्रास जाणविला तर घाबरु नका..अजिबात घाबरु नका.. ताप आला तर घाबरु नका..आपल शरीर त्या बाहेरील शत्रुशी भांडत आहे.. व त्यामुळे चिंता करु नका..

जर दोन- तिन दिवसानंतर सुद्धा ताप उघडला नाहीच..लक्षणे कमी झालीच नाहीत.. तर मग औषध घ्या.. ते पण न घाबरता…

आपण आपल्या विश्वास नावाच्या शक्तीला वापरु शकतो.. आपल शरीराल फक्त तसे आदेश द्यायचे आहेत.. मग सगळ त्याच्यावर सोपवा…

डाॅवर विश्वास ठेवाच कारण मी स्वतःच डाॅक्टर आहे .. त्यामुळे हे सांगतोय.. डाॅक्टर वर अविश्वास दाखवु नका.. पण समोरचा डाॅक्टर हा शिकलेला असावा.. आजकाल योग्य डीग्री नसतांना सुद्धा लोक स्वतःला डाॅक्टर म्हणवुन घेतात.. किंवा ज्याच ज्ञान नाही ते दुसरयांच बघुन औषध देतात.. त्यांच्यापासुन सुद्धा सावधान..

महत्वाच म्हणजे आपल शरीर स्वतःच एक डाॅक्टर आहे.. फक्त त्याला योग्य तो आदेश हवा.. काही गोष्टी सांगतो .. त्याचा अवलंब करा..

_ तुमच्या आवडीची गाणी ऐका.. जेणेकरुन तुमच मन प्रसन्न राहील..

– तुम्हाला कोरोना ची कितीही लक्षणे असली , औषध उपचार सुरु असला.. तरी अजिबात घाबरु नका..

– मनातल्या मनात स्वतःला हे सांगत राहा की मी नक्की नक्की बरा होणारच आहे.. मी नक्की बरा होणारच आहे.. मी नक्की बरा होणारच आहे.. मला काहीही झालेल नाही..

– कोरोना झाला असेल किंवा नसेल .. श्वसनाचे व्यायाम करा. अनुलोम , विलोम ( कमीत कमी ४ मिनिट ).. ओम चा जाप हा कमीत कमी २५ दा तरी करा ( दिवसातुन ३-४ दा )..

– ज्यांना कोरोना झाला असेल त्यांना आवर्जुन फोन करा.. त्यांना सांगा की तु नक्की बरा होशीलच…कारण १०० पैकी ९० -९५ लोक बर होत आहेत…

– जरी कुणी आयुर्वेदीक काढा ने कोरोना अस सांगत असेल तर ते घेण्यास सुद्धा हरकत नाही.. ( त्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाही.. विश्वास ठेवा..विश्वास स्वतःच एक औषध आहे.. .. .. )..

– भुक लागत नसेल तरी स्वत:ला हे सांगा की मला ह्या ह्या वेळी चांगल पोटभर जेवायच आहे.. तशी कल्पना करा ..की मी जेवत आहे.. पोटभर जेवत आहे..

– चांगल पोष्टीक अन्न खा.. वरण , पोळी, भात , भाजी, नारळ पाणी ( दिवसातुन ४-५ ग्लास ),फळांचा ज्युस/दुध, लिंबुपाणी, अंडी .. तुम्हाला जी भाजी आवडते , जे आवडत ते वेगवेगळे पदार्थ आवर्जुन खा..ते पदार्थ पोष्टीक असावेत..

– चांगली आनंदी झोप घ्या.. झोप सुद्धा औषधाच काम करते..अजिबात चिंता करायची नाही.. शांत झोप घ्यायची मित्रांनो.. उद्याच उद्या बघुया..

– ज्यांना कोरोना झालेला आहे ..त्यांनी परत परत कागदावर , वहीवर , मोबाईलवर लिहा की मी बरा होईन , मला काही एक झालेल नाही आहे.. जेणेकरुन तुमच्या ते मनाला मान्य होईल.. कमीत कमी १० दा तरी हे लिहा.. खाली टाईमपास करत असाल तर हे करा.. परत परत लिहा , परत परत टाईप करा.. एकच वाक्य..

_ आजकाल समाजमाध्यम , न्युज नकारात्मकता जास्त पसरवत आहेत… पण ते जे सांगत आहेत.. ते अर्धसत्य आहे..हजार पैकी ५ लोक ह्यांना त्रास आहे.. तर ते हे कधीच दाखविणार नाही की ९९५ लोक स्वस्थ आहेत.. त्यामुळे ते बघणे टाळा.. ते तुम्हाला व तुमच्या शरीराला विष तैयार करण्यासाठी मजबुर करत आहेत..

– डोळ बंद करा.. व १० मिनिट तरी बस श्वासावर लक्ष ठेवा…श्वास येत आहे, श्वास जात आहे.. बस इतकीच अनुभुती . बाकी सगळ त्या क्षणासाठी विसरुन जा… कोणता मनात विचार नाही.. कोणता मनात आस नाही… कोणती मनात भिती नाही.. आपल्या स्वतःला त्या श्वासाला समर्पित करा.. जेव्हाही तुम्हाला घाबरल्या सारख वाटेल.. तेव्हा तेव्हा हे करा.. तुम्ही हे झोपुन सुद्धा , बेडवर सुद्धा करु शकता..

– योग्य डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.. स्वत:हुन किंवा मेडीकल शाॅप वाल्याच्या सल्ल्यावरुन औषध घेवु नका.. जरी तुम्हाला नावे माहीत असतील तरी.. डाॅ नी दिलेल्या सुचनांच पालन करा.. औषध वेळेवर घ्या..

मित्रांनो , मन व मनाची शक्ती अथांग आहे.. चला ह्या शक्तीचा कोरोना ला पळविण्यासाठी उपयोग करुया..जस काही लोकांनी शेवटच्या क्षणी सुद्धा आतंरीक उर्जेच्या बळावर कोरोनावर मात केली , तसच आपण करुया..

जे कुणी वाचत असेल किंवा जो कुणी ह्या वेळी त्रासात असेल.. विश्वातिल समस्त चांगल्या शक्तींना मी ह्या क्षणी प्रार्थना करतो की त्या सर्वांची दु:ख दुर व्हावी..त्यांचा आजार बरा व्हावा..

लवकरात लवकर बरे व्हा.. तुम्ही बरे होणारच.. अंह, अजिबात घाबरायच नाही.. थोड दोन क्षणासाठी हसा बघु..
कोरोना , दो दिन की बात है दोस्त.. जिंदगी अभी बाकी है.. बहुत सी जंग अभी फतेह करनी है.. ये तो बस एक मामुली जंग है.. हिम्मत नही हारना है.. हमे जितना हमे..हम जरुर जितेंगे..


by Dr. sameer gahane , MBBS ..

About Vishwbharat

Check Also

प्रोटीन के मामले में खडा मूंग खाने से 1 महीने में बन जाएगी तगड़ी बॉडी

प्रोटीन के मामले में खडा मूंग खाने से 1 महीने में बन जाएगी तगड़ी बॉडी …

नाक और कान में गुनगुना सरसों का तेल डालने के रामबाण फायदे!

नाक और कान में गुनगुना सरसों का तेल डालने के रामबाण फायदे! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *