सीरम, बायोटेकने लसीच्या किंमती कमी कराव्या : केंद्र सरकार
नवी दिल्ली-
कोरोना महामारीसारख्या संकटात कंपनींच्या नफा कामविण्यावर अनेक राज्यांनी टीका केल्यानंतर केंद्र सरकारने सोमवारी पुण्यातील सीरम संस्था आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीला लसींच्या किमती कमी करण्यास सांगितले आहे.
कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लस किंमतीच्या मुद्यांवर चर्चा झाली. आता या दोन्ही कंपन्या त्यांच्या लसींसाठी सुधारित किंमती घेऊन येतील अशी अपेक्षा आहे. भारत बायोटेक राज्य सरकारांना कोवॅक्सिन लसीची एक मात्रा 600 रुपयांना, तर खाजगी रुग्णालयाला 1200 रुपयांमध्ये देत आहेत. सीरम राज्य सरकारांना आपली कोव्हिशिल्ड लसीची एक मात्रा 400 रुपयांना, तर खाजगी रुग्णालयांना 600 रुपयांना देत आहे. केंद्र सरकारला या दोन्ही लसींची एक मात्रा 150 रुपयांना मिळत आहे. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार असून, कंपन्यांनी लसींच्या मात्रांचे दर कमी करावे अशी मागणी राज्य सरकारांनी लावून धरली आहे.
Check Also
शुगर पेशेंट के लिए रामबाण है यह सफेद मूसली : शरीर में बढ़ेगा इंसुलिन
शुगर पेशेंट के लिए रामबाण है यह सफेद मूसली : शरीर में बढ़ेगा इंसुलिन टेकचंद्र …
काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द
काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द टेकचंद्र सनोडिया …