चंद्रपूर, ता. २८ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (ता. २८) मनपाने चंद्रपूर शहरातील झोन क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या भानापेठ, गंजवॉर्डातील तीन दुकानदारांविरुद्ध कारवाई करीत १२ हजारांचा दंड वसूल केला.
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. एकच्या सहायक आयुक्त धनंजय सरनाईक यांच्या मार्गदर्शनात झोन अधिकारी, अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. भानापेठ, गंज वॉर्डातील गुप्ता किराणा, रंजित ड्रेसेस, दूलाल शाह आदी प्रतिष्ठाने नियमांचे उल्लंघन करून सुरु होती. या ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १२ हजार रुपयाचा दंड वसूल केला. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.
भानापेठ, गंजवॉर्डातील तीन दुकानदारांना दंड
भानापेठ, गंजवॉर्डातील तीन दुकानदारांना दंड
मनपाची कारवाई : १२ हजारांचा दंड केला वसूल