Breaking News

मूलमध्ये भल्या पहाटे नागरिकांना अस्वलचे दर्शन

– बेशुध्द करून केले जेरबंद
– केळझरच्या जंगलात निसर्गमुक्त

मूल-
शहरातील शिक्षक वसाहत परिसरात सोमवार, 3 मे रोजी भल्या पहाटे नागरिकांना अस्वलचे दर्शन घडले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली. दरम्यान, अस्वलने या परिसरात थरार माजविला. वॉर्डातील गल्लीबोळात या अस्वलने फेरफटका मारला. त्यामुळे नागरिकांत दहशत पसरली. अखेर वनविभागाच्या चमुने बेशुद्धीचे इंजेक्शन देवून तिला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्‍वास घेतला. जेरबंद केलेल्या या अस्वलला वैद्यकीय तपासणीअंती केळझरच्या जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले.
येथील बफर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांना सोमवारी पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास वसाहत परिसरात अस्वलीचे दर्शन झाले. भरकटलेली अस्वल वसाहतीत घुसल्याने नागरिक भयभित झाले. लागलीच याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. अस्वलला जेरबंद करण्याची मोहिम वनविभागाच्या चमुने राबवली. बर्‍याच प्रयत्नानंतर अस्वल जेरबंद झाली नाही. त्यानंतर ताडोबातील वन्यजीव संरक्षण दलाला पाचारण करण्यात आले. लोकांच्या गर्दीने भयभित झालेल्या अस्वलाने वस्तीतील एका स्नानगृहाचा आधार घेतला होता. या पथकाने तिला बेशुद्धीचे इंजेक्शन लावले. त्यानंतर तिला सुरक्षितरित्या पकडल्या गेले. मूल येथील वनविभागाच्या कार्यालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रकृती उत्तम असल्याने तिला केळझर जंगल परिसरात निसर्गमुक्त करण्यात आले.
ही कामगिरी सहायक उपवनसंरक्षक लखमावाड, वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पोडचलवार, अजय मराठे यांच्या नेतृत्वात आरआरटी पथक, क्षेत्र सहायक खनके, वनरक्षक मरस्कोल्हे, गुरनुले, विशेष व्याघ्र संरक्षण पळक व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार, स्वप्नील आक्केवार, दिनेश खेवले, अंकुश वाणी, संकल्प गणवीर, प्रतिक लेनगुरे, यश मोहुर्ले यांनी केली.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *