Breaking News

पंतप्रधान घेणार मोठा निर्णय…देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत   – ‘टास्क फोर्स’ची बैठक महत्त्वाची

Advertisements

पंतप्रधान घेणार मोठा निर्णय…देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत
  – ‘टास्क फोर्स’ची बैठक महत्त्वाची 
नवी दिल्ली,
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भारतात पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, अनेक तज्ज्ञ, टास्क फोर्स आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर पंतप्रधान मोदीआपल्या निर्णयाचा फेरविचार करु शकतात, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरज पडल्यास लॉकडाऊन करावा, अशी सूचना केली आहे.

Advertisements

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनसाठी पंतप्रधान मोदींवरील दबाव वाढला आहे. मात्र, त्यापूर्वी दुर्बल घटकांची योग्यप्रकारे सोय करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारतात गेल्या 24 तासात 3 लाख 68 हजार 147 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. तर काल दिवसभरात तब्बल 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर दुसऱ्या बाजूला भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. काल दिवसभरात 3,00,732 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

तहसीलदारांचा ऑनलाईन सर्विस सेंटरवर छापा : जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

शासकीय अधिकाऱ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीचे बनावट कागदपत्रं तयार करुन नागरिकांकडून ते अव्वाच्या सव्वा शुल्क आकारत होते. …

वनाधिकाऱ्याला अटक : चंद्रपूरातील वाघांच्या शिकारीचे दिल्ली कनेक्शन

राज्यातील वाघांच्या शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड (८१) यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *