Breaking News

ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, सर्व आमदारांचा शपथविधी ६ मे रोजी होणार

Advertisements

पश्चिम बंगाल- अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरशा धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यानंतर आता ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Advertisements

तर, सर्व आमदारांची शपथविधी ६ मे रोजी होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली, यामध्ये हा निर्णय झाला आहे. तर, शपथविधी प्रसंगी कोणताही मोठा समारोह होणार नाही, राज्यापाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे. याप्रसंगी त्यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री देखील शपथ घेण्याची शक्यता आहे. त्या सर्वांची यादी तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्रीपदाची ही तिसरी वेळ असणार आहे. तसेच,  ममता बॅनर्जींनी सर्व आमदार, नेते व कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की, कोरनाची गंभीर परिस्थिती असल्याने कोणीही विजयी रॅली काढू नका, जल्लोष करू नका असं ममता बॅनर्जींनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

भारत से चीन की नजदिकीया?: आर्थिक परिस्थितियों से जूझ रहा चीन

नई दिल्ली। किसी भी महत्वपूर्ण वित्तीय प्रोत्साहन उपायों के बिना सरकार का रूढ़िवादी विकास लक्ष्य, …

जनसंख्या में वृद्धि और मुफ्तखोरी की वजह से मंहगाई की मार झेल रहे है लोग

नई दिल्ली। सरकार जब भी बजट प्रस्तुत करती हैं मंदी और महंगाई से आम लोगों …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *