Breaking News

इको-प्रोचे नितीन बुरडकर यांचे निधन

इको-प्रोचे नितीन बुरडकर यांचे निधन
चंद्रपूर : इको प्रो पर्यावरणप्रेमी संस्थेचे वन्यजीव विभाग प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते नितीन बुरडकर यांचे आजाराने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते.
बालाजी वार्ङ निवासी नितीन बुरडकर यांनी तरुणवयात सामाजिक कार्याला सुरवात केली. इको-प्रोच्या स्थापनेपासून ते सेवाकार्यात जुळले होते. अदाणी गो बैक आंदोलनात सक्रिय सहभाग, मालधक्का प्रदूषण विरोधी आंदोलन, चंद्रपूर किल्ला सफाई अभियानात पूर्णवेळ सक्रिय राहून महाराष्ट्र किल्ला भ्रमंती, वन्यजीव भ्रमणमार्ग संरक्षण करिता मूल ते चंद्रपूर पैदल मार्च, रामाळा तलाव संवर्धन आंदोलन यासह अनेक जनआंदोलनात सहभाग घेतला होता. मागील काही वर्षांपासून वन्यजीव विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते. १९५० रोजी स्थापन झालेल्या बालाजी वार्डमधील राष्ट्रीय गणेश मंडळाचे २५ वर्षापासून अध्यक्ष होते.
 मागील आठवङ्यात प्रकृती बिघडल्याने चंद्रपूरहून नागपूरला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सोमवार, दि. ३ मे रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वाहिनी, पुतन्या असा बराच मोठा आप्त परिवारासह बराच मोठा मित्र परिवार आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *