Breaking News

खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचे कोविड केयर सेन्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत 24 तास सुरू.

Advertisements

खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचे कोविड केयर सेन्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत 24 तास सुरू.

Advertisements
  • पंतप्रधानाच्या आवाहनवर खा. तडस यांचा पुढाकार.
  • रुग्ण सेवा हीच खरी सेवेच्या द्यास घेऊन कोविड रुग्णाच्या सेवेला सुरवात.

वर्धा:- 
देवळी शहर आणि लगतच्या ग्रामीण परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये खाटा अपुरे पडत असल्याने खा. रामदास तडस यांच्या पुढाकाराने  विभागीय ड्राइविंग प्रशिक्षण केंद्र आणि भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा यांच्या संयुक्त प्रयत्नाने देवळी शहरालगतच्या इसापूर येथे कोरोना उपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. शहरापासून अवघ्या 4 किमी अंतरावर असलेल्या इसापुर येथे विभागीय ड्राइविंग प्रशिक्षण केंद्रची नवनिर्मित सुसज्जीत इमारत आहे, देवळीत कोरोना रुग्ण वाढल्यास प्राथमिक उपचारासाठी इसापुर येथील इमारत उपलब्ध करून दिली ,
बुधवारी या केंद्राचे खा. तडस यांच्या हस्ते उदघाटन झाले.या केंद्रात दोन मोठे हॉल आणि सहा
खोल्यामध्ये वीज आणि कुलर अशा सुविधा उपलब्ध आहे.
ग्रामीण व शहरी भागात कोरोना रुग्णांना गृह विलगीकरणाची वेवस्था नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, अश्या सौम्य लक्षण असलेल्या कोरोना रुग्णांना या कोविड केयर सेन्टर मध्ये संस्थात्मक विलगिकरन केले जाईल जेणे करून कोरोना रुग्णां मुले त्यांच्या घरच्यांना व परिसरातील लोकांना कोरोनाचा लागण होऊ नये.
सादर कोविड सेन्टर मध्ये १०० खाटांची वेवस्था,सकाळी चहा नास्ता, दुपारी व सायंकाळी जेवण,२४ तास पिण्याकरिता गरम पाणी,सुसज्ज असे संडास बाथरूम,निसर्गरम्य असा परिसर,रुग्ण करीत वैद्यकीय सेवा व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, सुरक्षा रक्षक,रुग्णांच्या नातेवाईकांना लांबून भेटण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे, सदर कोविड केयर सेन्टर हे संपूर्ण मोफत राहील असे सुद्धा खासदार रामदास तडस यांची संगीयले,याप्रसंगी झालेल्या छोटेखानी समारंभामध्ये खा. तडस यांनी या केंद्राचा लाभ देवळी व्यतिरिक्त जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा होईल असे स्पष्ट केले.रुग्णालयामध्ये गर्दी असल्याने उपचारासाठी फिरणान्या सर्व कोरोना रुग्णांना त्वरित उपचार मिळावे अशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आज कृतीत उतरविल्याचा आनंद, खा.तडस यांनी व्यक्त केला. याचा लाभ देवळी परिसरातील कोरोना रुग्णांना होऊन त्यांचे मनोधैर्य खालावणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Advertisements
भविष्यात प्राणवायूयुक्त खाटाची उपलब्धता करून देण्यात येईल असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला.या उपचार केंद्रामध्ये भिडी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आणि कर्मचारी सेवा देणार, रुग्णांना घरून आणण्या पासून गंभीर स्थिती उद्भवल्यास मोठया इस्पीतळात त्वरित हलविण्यासाठी 24 तास रुग्णवाहीका सेवा उपलब्ध असल्याचे सांगून त्यासाठी 9730929263 हा मदत ध्वनीक्रमांक त्यांनी घोषित केला.
या प्रसंगी खासदार रामदास तडस  यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खा. तडस यांनी कोरोना निर्मूलनासाठी वर्धा जिल्ह्यात केलेल्या मदतकार्याची माहिती देऊन राज्य शासन कोरोनाच्या दुसन्या लाटेत  अपयशी झाल्याचे मुद्द्यांशी स्पष्ट केले.भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत खा. तडस समेत जिल्ह्यातील अन्य भाजप लोकप्रतिनिधीनी केलेल्या कोरोना संदर्भातील कार्याची माहिती दिली.  या कोविड केयर सेन्टर ला एसएमडब्लु इस्पात प्रा.लि. चे कार्यकारी प्रबंधक सुरतराम दाखेरा यांनी देवळी परिसरासाठी महालक्ष्मी स्टीलची सामाजिक बांधिलकी असल्याचे म्हटले.कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन जिप सभापती मिलिंद भेंडे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.सरिताताई गाखारे, नप देवळी उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर,माजी जिल्हा परिषद कृषी सभापती मुकेश भिसे, न.प देवळी सभापती नंदूजी वैद्य,  इसापुर सरपंच
प्रणिता आंबटकर, तहसीलदार राजेश सरवदे, ना. तहसीलदार राजेंद्र देशमुख, ठाणेदार तिरुपती राणे,महालक्ष्मी स्टीलचे जनसंपर्क
अधिकारी रमेशनाथ,भिडी ग्रा. रुग्णालयाचे डॉ. राठोड, डॉ. मोहोड, डॉ. भोयर उपस्थित होते.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित असाल तर..!

शरीरातील पाण्याची पातळी राखणे हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तज्ज्ञ रोज १० ते १२ …

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय!

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *