Breaking News

कोविड लसीकरणात घुग्घुस येथील स्थानिकांना प्राधान्य द्या-विवेक बोढे

कोविड लसीकरणात घुग्घुस येथील स्थानिकांना प्राधान्य द्या*
*घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी*
      घुग्घुस-प्रभाकर कुम्मरी- घुग्घुस येथील जिल्हापरिषद प्राथमिक कन्या शाळा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव  भोंगळे यांच्या सूचनेनुसार गुरुवार 6 मे पासून 18 ते 44 वर्षाच्या वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सुरु करण्यात आले.
परंतु ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरु असल्याने चंद्रपूर शहरातील नागरिकांनी तसेच इतर शहरातील नागरिकांनी या केंद्रात मोठी गर्दी केली, त्यामुळे घुग्घुस परिसरातील  नागरिक मागे पडले हे चित्र बघून स्थानिक घुग्घुस वासियात तीव्ररोष निर्माण झाला.
सध्या घुग्घुस परिसरात कोविड रुग्णांची संख्या व मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे लसीकरणासाठी स्थानिक घुग्घुसचे नागरिक या लसीकरण केंद्रात लसीकरण करण्यासाठी धाव घेत आहे.
या केंद्रातून कोविड लसीकरणासाठी गेलेल्या स्थानिकाना मोठी गर्दी होत असल्याने परत जावे लागत आहे.
ही समस्या लक्षात घेत घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून या केंद्रावर स्थानिक घुग्घुस वासियांना प्राधान्य मिळण्यासाठी हे लसीकरण केंद्र फक्त घुग्घुस वासियांना करिता उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *