पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तात्काळ द्या
– खा. बाळू धानोरकर यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
चंद्रपूर,
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून, मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी लस हाच एकमात्र पर्याय आहे. लसीच्या पहिला डोस अनेक नागरिकांनी घेतला आहे. परंतु, दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक दिवस सकाळी 5 वाजता रांगेत लागून देखील लस मिळत नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे पहिला डोस घेतल्यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारून दुसरा डोस तात्काळ द्या, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केली आहे.
मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध नसल्यामुळे हजारो नागरिक अनेकदा तासनतास वाट बघत लसीकरण केंद्राच्या बाहेर उभे असतात. त्यामुळे हे लसीकरण केंद्र जणू कोरोना विषाणूच्या प्रसार होणारे केंद्र आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
अनेकदा तासनतास उभे राहूनदेखील लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना निराश होऊन घरी परत जावे लागत आहे.
परंतु, त्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना 45 दिवस लोटून देखील दुसरा डोस मिळत नसल्यामुळे आता करायचे काय, असा प्रश्न त्यांना पडत आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोसला खूप उशीर होत असल्याने जिल्ह्यातील इतर लसीकरण केंद्राच्या आधार अनेक नागरिक घेत आहे. मात्र, सामान्य माणूस दुविधेत पडला आहे. त्यामुळे त्वरित हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता तात्काळ दुसर्या डोस घेण्याकरिता स्वतंत्र केंद्र उभारण्याची मागणी धानोरकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.

पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तात्काळ द्या – खा. बाळू धानोरकर यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
Advertisements
Advertisements
Advertisements