पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
पुणे-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मे रोजी ही परीक्षा होणार होती.
यापूर्वी 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा कोरोनाच्या संसर्गामुळे 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी आणि आठवीची माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर टाकल्याची घोषणा केली. राज्य परीक्षा परिषदेने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वनियोजनाप्रमाणे पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 25 एप्रिलला आयोजित करण्यात आली होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर घेण्यात आला. परीक्षेसाठी 23 मे ही नवीन तारीख निश्चित केली होती. आता पुन्हा एकदा परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली.
Check Also
भरदिवसा धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला : दोघे…!
बिबट्याचा संचार वाढला आहे. जेमतेम काही दिवसांच्या कालावधीतच बिबट्याने चौघांवर हल्ले करून गंभीर जखमी केल्याने …
आर्थिक गुन्ह्यात तीनदा अडकलेले नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. धवनकर कसे सुटतात?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. …