Breaking News

बालकांना परस्पर दत्तक देणे-घेणे वा खरेदी-विक्री करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा

बालकांना परस्पर दत्तक देणे-घेणे वा खरेदी-विक्री करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा

अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्यांवर होणार कठोर कार्यवाही

चंद्रपूर, दि.11 मे :  कोरोनामुळे दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक घेऊन त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाज माध्यमांवर पोस्ट दिसून येत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी व त्या थांबवण्यासाठी त्याबाबतची माहिती मिळाल्यास चाइल्ड लाइन हेल्पलाईन क्रमांक 1098 वर संपर्क साधावा अथवा सारा महाराष्ट्राच्या स्टेट अडोप्शन रिसोर्स एजन्सीच्या 8308992222, 7400015518 व 8329041531 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत माहिती द्यावी, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांनी केली आहे.

कोविड परिस्थितीत पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. कोरोना परिस्थिती इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमधेही मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्या सोबतच कोरोना आजाराने दोन्ही पालकांचा मृत्यू  झाल्यामुळे बालकांची अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. अशा बालकांचा काही वेळ आपल्या स्वीकार्याकडून स्वीकार न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे.

एकीकडे अशा बालकांचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत असून काही समाजकंटक या समस्येचा वापर संधी म्हणून करून घेत परस्पर मुलांची विक्री करत असल्याचे चित्र समाज माध्यमांवरील पोस्टवरून दिसून येते. यासाठी फेसबुक, व्हाट्सअॅप,इंस्टाग्राम, टि्वटर इत्यादी समाज माध्यमांचा वापर करून त्यावर विधी भावनात्मक पोस्ट टाकल्या जात आहे व बालके दत्तक घेण्यास उपलब्ध आहेत असे चित्र निर्माण केले जात आहे. हे समाजकंटक बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अशा प्रकारे बालकांना परस्पर दत्तक देणे- घेणे किंवा खरेदी-विक्री करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारचे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860, मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 तसेच दत्तक नियमावली 2017 नुसार कठोर कार्यवाहीस पात्र राहील.

येथे साधा संपर्क:

राज्यात कुठेही कोरोना आजाराने पालक गमावल्यामुळे अनाथ झालेली बालके आढळून आल्यास चाईल्ड लाईन-1098 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा अथवा SARA महाराष्ट्राच्या स्टेट अडोप्शन रिसोर्स अथोरिटी 8308992222, 7400015518 व  8329041531 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत  माहिती द्यावी. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती तसेच जवळच्या पोलिस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून या बालकांना ताब्यात द्यावे. अशा बालकांची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल.

अशी आहे दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया:

बालक दत्तक घेताना गैरप्रकार होऊ नये म्हणून बाल न्याय अधिनियमानुसार पालकांना प्रक्रियेची पूर्तता करणे गरजेचे असते. बाल न्याय अधिनियम 2015 च्या कलम 80/81 अंतर्गत बालकांना दत्तक घेण्यास या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कडक कार्यवाही करण्याची तरतूद आहे. बालकांना दत्तक  घेण्यासाठी www.cara.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रियेद्वारे बालकांना दत्तक घेता येते. या प्रक्रियेचे पालन न करणाऱ्या पालकांवर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयामार्फत कायदेशीररित्या कठोर कार्यवाही करण्यात येईल.

About Vishwbharat

Check Also

रायपुर में रिश्वत लेते महिला पुलिस अधिकारी गिरफ्तार

रायपुर में रिश्वत लेते महिला पुलिस अधिकारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रायपुर। महिला …

62 गौ हत्यारों पर 10-10 हजार का इनाम? नागपुर निवासी हैं सभी आरोपी

62 गौ हत्यारों पर 10-10 हजार का इनाम? नागपुर निवासी हैं सभी आरोपी   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *