पारधी आदीवासी समाजातील चार व्यक्तींवर लावलेले खोटे गुन्हे मागे घ्या-शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम
आधारशून्य कार्यवाही करून गुन्हे कबूल करण्यास पोलिसांची सक्ती
वरोरा- वरोरा पोलीस स्टेशम अंतर्गत येवती परिसरातील जंगलामध्ये पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून मोहफुलांची गावठी दारू साठा जप्त केला.परंतु,दारू साठ्याजवळ कोणत्याही आरोपीला अटक न करता व कोणतीही चौकशी न करता आणि दारुसाठयाशी व दारू प्रकरणाशी कसलाही संबंध नसतांना चार पारधी आदीवासी बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची नावे सोशल मीडिया आणि वृत्तपत्राद्वारे जाहीर करून त्यांची बदनामी केली करण्यात आली आहे.तसेच एवढ्यावरच पोलीस थांबले नाही तर माढेली चौकीला बोलावून गुन्हे कबूल करण्यास सक्ती करण्यात येत असून,सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दारुसाठयाशी संबंधित गुन्हेगाराला पकडून चारही निर्दोष आदिवासी बांधवावर चुकीच्या पद्धतीने लादलेले गुन्हे मागे घेण्यात यावे
अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.
येवती गावाच्या जंगल परिसरात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारावर मोहफुलांच्या गावठी दारू साठ्यावर धाड टाकून दारूसाठा जप्त करण्यात आला.परंतु,दारूसाठया जवळ कोणतीही प्राथमिक चौकशी न करता आणि कोणत्याही आरोपीला अटक न करता व गावठी दारू प्रकरणाशी कसलाही संबंध नसतांना पारधी आदीवासी बांधव दिनेश व्ही पवार, विठ्ठल ह पवार, अनिल माळवे, चंद्रकांत घोसरे रा.येवती(पारधी टोला) ता.वरोरा येथील रहिवासी असून यांचा दारू साठयाशी कोणताही संबंध नसतांना यांची नावे सोशल मीडिया आणि वृत्तपत्राद्वारे नावे जाहीर करून त्यांचेवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.आणि त्यांना माढेली चौकीला बोलावून गुन्हे कबुल करण्यास पोलिसांकडून प्रताडीत करण्यात येत असून.एक प्रकारचा त्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप होत आहे.दारूसाठ्याचा नेमका खरा सूत्रधार कोण आहे याचा शोध न घेता चार निर्दोष आदिवासी बांधवावर
गुन्हे लादणे ही अन्यायकारक कृती असून,चुकीच्या पद्धतीने लादलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम यांनी एका निवेदनाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केलेली आहे.
बंडू नामक दारू तस्कराचा पोलीस अधिकाऱ्यांशी आर्थिक संबंध !
येवती जंगल परिसरात दारूसाठा पकडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोशल मीडिया व वृत्तपत्रात आलेल्या माहितीनुसार वरोरा पोलीस स्टेशन मधील कार्यरत पोलीस कर्मचारी प्रवीण रामटेके याला मिळालेल्या माहितीवरून वरोरा शहरात देशी विदेशी दारूसाठा भरलेले वाहन येत असल्याची माहिती मिळताच त्यांनी जीवाची पर्वा न करता 208 पेटी देशी-विदेशी दारू असलेले वाहन पकडून याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना दिली असता हा माल बंडू नामक दारू तस्कराचा असल्याने व त्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी आर्थिक संबंध असल्याने त्या दारू तस्कराला पाठीशी घालून दारू पकडणाऱ्या प्रवीण रामटेके याला धमकावून ,शिवीगाळ करून दारूसाठा असलेली गाडी सोडून देण्यास दबाव आणला परंतु,पोलीस कर्मचारी दबावाला बळी पडला नाही.बंडू नामक दारू तस्करने सर्व प्रकारचे आमिष दिले नंतर धमकवण्यात आले.परंतु,पोलिस कर्मचारी आपल्या कार्यवाही वर ठाम राहिला.बंदु नामक व्यक्ति हजर असताना सुद्धा त्याचेवर त्याला अटक करुण गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही जाली नाही. दुसरीकडे खोट्या गुह्यात चार पारधी आदिवासी बांधवाना गोवून त्यांना प्रताड़ित करने हा पोलिसांकरवी एक अन्यायच आहे
कोविदमुळे महाराष्ट्रात संचारबन्दी लागू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू साठा दारुबन्दी जिल्ह्यात येतोच कसा ?असा प्रश्न जनसामान्यांत चर्चेचा विषय बनला आहे.
वरील दोन्ही प्रकरणात मुख्य आरोपींना पकडून त्यांच्यावर कारवाही करून पारधी आदिवासी बांधवावर लादलेले गुन्हे मागे घेण्यात यावे व जिल्ह्यात येणारी दारू यावर पोलीस प्रशासनाने आळा न घातल्यास मी स्वतः कार्यकर्त्यासोबत रस्त्यावर उतरून दारू तस्करी वाहन व दारू साठा ,दारू तस्कर यांना पकडून शिवसेना स्टाईलने पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल.
असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम यांनी निवेदनाद्वारे पोलीस अधिकाऱयांना दिलेला आहे.