Breaking News

आवळगाव वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू

आवळगाव वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू
ब्रम्हपुरी, 
तालुक्यातील कुडेसावली स्मशानभूमीलगत एक मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे ब्रम्हपुरी वनविभागात खळबळ उडाली. ही घटना बुधवार, 12 मे रोजी सायंकाळी उघडकीस आली.
ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव वनपरिक्षेत्रातील हळदा बिटातील कक्ष क्रमांक 1178 मध्ये हा बिबट मृतावस्थेत आढळला. कुडेसावली येथील नागरिक बुधवारी सायंकाळच्या सुमारास फिरायला गेले असता, त्यांना दुर्गंधी आली. नागरिकांनी घटनास्थळ परिसरात पाहणी केली असता, बिबट मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एल. शाह, वन्यजीव रक्षक विवेक करंबेळकर घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *