राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला, 31 मेपर्यंत निर्बंध कायम
मुंबई-
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे १५ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. अशातच राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला. आता राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. सध्याचे निर्बध आणखी १५ दिवस वाढविण्याची एकमुखी मागणी बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यानुसार लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाकरे सरकारने निर्बंध अजून कठोर केले असून बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट असं बंधनकारक असून प्रवेश कऱण्याच्या ४८ तास आधी हा रिपोर्ट काढलेला असावा असे आदेशात नमूद आहे. दरम्यान देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असतील. दरम्यान कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी दोघांनाच परवानगी असणार आहे. जर हे कार्गो कॅरिअर बाहेरच्या राज्यातून प्रवेश करत असतील तर निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असून ४८ तासांच्या आत तो काढलेला असावा.

राज्यातील लॉकडाऊन पुन्हा वाढला, 31 मेपर्यंत निर्बंध कायम
Advertisements
Advertisements
Advertisements