Breaking News

मोरचूल चकमकीत मारल्या गेले नक्षली राजा मडावी व रनिता गावडे : दोघांवर होते 14 लाखांचे बक्षीस

Advertisements

मोरचूल चकमकीत मारल्या गेले नक्षली राजा मडावी व रनिता गावडे : दोघांवर होते 14 लाखांचे बक्षीस

धानोरा उपविभागातील सावरगाव पोमके अंतर्गत येणाऱ्या मोरचूल जंगल परिसरात आज सकाळी नक्षलवादी व सी-60 जवानांत झालेल्या चकमकीत मोरचूल निवासी टीपागड एरिया प्लाटून-15 चा कमांडर राजा उर्फ रामसाय नेहरू मडावी व धानोरा तालुक्यातील बोटेझरी निवासी, कसनसूर एलओएस सदस्य रनिता उर्फ पुनीता चिंपळूराम गावडे या दोन नक्षल्यांचा पोलीसांनी खात्मा केला असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Advertisements

पोलीसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर मोरचूल जंगल परिसरात सकाळी 6 ते 6.30 वाजताच्या सुमारास सी-60 पोलीसांद्वारे केलेल्या सर्चिंग अभियाना दरम्यान 40 ते 50 नक्षलवाद्यांनी पोलीसांची चाहूल लागताच गोळीबार केला. पोलीसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन नक्षली मारल्या गेले व बाकी जंगलाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

Advertisements

मृतक राजा मडावीवर अनेक गुन्हे दाखल असून त्याच्यावर 12 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले हाते. तर रनिता वरही विविध गुन्हे दाखल असून तिच्यावर 2 लाखांचे बक्षीस होते. शोध मोहिमेदरम्यान एक एसएलआर, एक 8 एम.एम. रायफल, कुकर बाॅम्ब व आयईडी ‘सहित दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले. या चकमकीत आणखी काही नक्षलवादी जखमी झाले असल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *