कोरोना संकटसमयी अल्ट्राटेक सिमेंटतर्फे “एक हात मदतीचा “
हिरापूर येथे आरोग्य सुविधा व रेशन किट वाटप..
कोरपना(ता.प्र.) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातील परिस्थिती लक्षात घेत कोरपना तालुक्यातील हिरापूर ग्रां.पं उसरपंच अरूण काळे व माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रमोद कोडापे यांनी अल्ट्राटेक सिमेंट वेल्फेअर फाऊंडेशन आवाळपूर यांच्याकडे रेशन किट व गावाला आरोग्य विषयी सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वजा विनंती केली होती.अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाने याला सकारात्मक प्रतिसाद देत हिरापूर गावाला “एक हात मदतीचा” म्हणून संबंधितांच्या मागणीनुसार २२ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे गावाला विविध आवश्यक आरोग्य सुविधा व ५० गरजू कुटुंबांना रेशन कीटचे वाटप केले.यावेळी सरपंचा सौ.सुनीता तुमराम,उपसरपंच अरूण काळे,सदस्य प्रमोद कोडापे,दुर्योधन सिडाम,योगीता टिपले,पोलीस पाटील मुरलीधर बल्की, मोहन तुमराम,तनवीर शेख,दत्ता डाहुले, सुनील कुमरे,किशोर शेंडे,ग्रा. पं.शिपाई सूरज आत्राम आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.कोरोना संकटसमयी मदतीचा हात दिल्याबद्दल हिरापूर वासीयांनी अल्ट्राटेक सिमेंटचे मनापासून आभार मानले आहे.