Breaking News

मनपाने उभारावे शिशु रूग्णालय – आ. सुधीर मुनगंटीवार यांची अपेक्षा

Advertisements

आ. मुनगंटीवारांनी घेतली आभासी आढावा बैठक
चंद्रपूर,
कोरोनाची तिसरी संभाव्य लाट आणि त्यात लहान मुलांना प्रामुख्याने धोका संभावणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. कृती दलानेसुध्दा ही भिती व्यक्त केली आहे. यादृष्टीने प्रभावी उपाययोजना म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सर्व सुविधांनी युक्त असे शिशु रूग्णालय उभारावे, अशी अपेक्षा आपण मनपाच्या आसरा कोविड रूग्णालयाच्या उद्घाटन समारंभात व्यक्त केली होती. यादृष्टीने मनपा प्रशासनाने आवश्यक तयारी करावी, यासाठी पीएम केअर, सीएम केअर तसेच वेकोलि व अन्य कंपन्यांच्या सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारण्याची सूचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Advertisements

सोमवार, 24 मे रोजी आ. मुनगंटीवार यांनी शिशु रूग्णालयाच्या उभारणीसाठी आभासी बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, संदीप आवारी, मनपा आयुक्त राजेश मोहिते, सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता अ. र. भास्करवार, उपायुक्त वाघ यांची उपस्थिती होती.

Advertisements

या शिशु रूग्णालयाच्या उभारणीच्यादृष्टीने जागा निश्‍चिती करण्याच्या व अंदाजपत्रक करण्याच्या दृष्टीने त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. यासाठी जागा मोठी असावी, त्यानजिक बालकांसाठी एक गार्डन तयार करण्यात यावे, बोलक्या भिंतींसह, बालकांसाठी आनंद देणार्‍या गोष्टींचा अंतर्भाव त्याठिकाणी असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. साधारणतः 15 ते 20 कोटी रुपये निधी उभारण्याची आवश्यकता असून, यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे ते म्हणाले. भारत सरकारच्या कामगार विभागाच्या माध्यमातूनही यासाठी मदत घेता येवू शकते, असेही ते म्हणाले.

यावेळी राखी कंचर्लावार यांनी आ. मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार शिशु रूग्णालय उभारणीच्या दृष्टीने मनपा प्रशासन सर्वशक्तीनिशी कार्य करेल, असे सांगितले. राजेश मोहीते यांनी, आसरा कोविड रूग्णालयाच्या शेजारी असलेली जागा तसेच सराई मार्केटमधील जागा यापैकी एक जागा या शिशु रूग्णालयासाठी उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती दिली. जागा निश्‍चिती झाल्यानंतर पुढील कार्यवाही वेगाने करू, असेही ते म्हणाले.

जागा निश्‍चितीचा प्रस्ताव तहसिलदारांमार्फत भुमी अभिलेख विभागाकडे गेला असून, प्रस्ताव प्राप्त होताच जागा मंजूरीबाबत कार्यवाही करण्यात येईल व शिशु रूग्णालयाच्या उभारणीसाठी त्वरेने कार्यवाही करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड से खत्म

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड …

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? प्रयोग के लिए सावधानियां जरुरी

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *