Breaking News

माजी आमदार अँड.चटप यांचा खंदा समर्थक “प्रभाकरराव दिवे” अनंतात विलिन.

Advertisements
माजी आमदार अँड.चटप यांचा खंदा समर्थक “प्रभाकरराव दिवे” अनंतात विलिन.
कोरपना(ता.प्र.)
          शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते,बळीराज्य विदर्भाचे प्रदेश उपाध्यक्ष,विदर्भ राज्य आंदोलन समिती कोर कमिटीचे सदस्य तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी मानद सचिव प्रभाकरराव दिवे यांचा ३१ मे रोजी नागपूर येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाला.काही दिवसांपूर्वी अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे ते नागपूर येथे उपचार घेत होते. प्रभाकर दिवे मागील दहा दिवसापूर्वी आवारपूर येथून राजूराकडे जात असताना गडचांदूरातील सना पेट्रोल पंप जवळ त्यांच्या कारचा अपघात झाला होता.यात त्यांच्या पायाला व मानेला गंभीर दुखापत झाली होती.उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.मात्र प्रकृती बघता त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले.मात्र गंभीर दुखापतीमुळे शेवटी ते गतप्राण झाले.त्यांच्या जाण्याने दुःखाचे सावट पसरले असून त्यांच्या वरती आवाळपूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सून,भावंड असा आप्तपरिवार असून दिवे यांच्या जाण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
                  ———-//——–
            प्रभाकर दिवे हा माझ्यासाठी माझ्या परिवारातील एक सदस्य होता.माझा कौटुंबिक राजकीय असा तो सल्लागार होता.त्याच्या जाण्याने शेतकरी संघटनेचा परिवार दुःखाने व्याकूळ झाला असून दिव्यांची पोकळी नेहमी आम्हाला भासत राहणार आहे.यापूर्वी झालेली अनेक आंदोलने,सत्याग्रह,न्यायालयीन लढायात तो मला माझ्या आप्तस्वकीय सारखा होता.
(माजी आमदार ॲड.वामनराव चटप)
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला …

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *