Breaking News

रेती तस्करीचे ट्रॅक्टरने तोडले रेल्वे फाटक!  – घुग्घुस परिसरात रेती तस्करांचा धुमाकूळ

Advertisements

रेती तस्करीचे ट्रॅक्टरने तोडले रेल्वे फाटक!
 – घुग्घुस परिसरात रेती तस्करांचा धुमाकूळ
चंद्रपूर,
मागील काही दिवसांपासून वर्धा नदीच्या चिंचोली घाटावरून रेती तस्करी जोमात सुरू आहे. मंगळवारी रात्री अवैध रेतीची तस्करी करणार्‍या ट्रॅक्टर चालकाने समोरील एसीसी सिमेंटच्या रेल्वे फाटकाला जबर धडक मारली. ही धडक जोरदार असल्याने फाटकाचे दोन तुकडे झाले.

Advertisements

अनेक दिवसांपासून या परिसरात अवैध रेती तस्करी सुरू आहे. पण येथील महसूल प्रशासनासह पोलिस विभागाचेही दुर्लक्ष होत आहे. हे रेल्वे फाटक पोलिस ठाण्याच्या अगदी समोर आहे. पण, रेती तस्करीला त्यांची मुकसंमती असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. रेल्वे फाटकाचे दोन तुकडे झाल्याने येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. रेती तस्करांवर आळा घालण्यासाठी पोलिस ठाण्यासमोर लावलेले सिसिटीव्ही कॅमेरे आता शोभेची वास्तू झाल्याचे दिसून येते.

Advertisements

मागील काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घुग्घुससह वरोडा, पोंभूर्णा येथे धाडसत्र राबवून अवैध रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले. तशीच कार्यवाही पुन्हा एकदा घुग्घुस परिसरात राबवावी, अशी मागणीही आता नागरिकांकडून केली जात आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

सनी लिओनसह अनेक कलाकारांवर ईडीचे छापे!

राजकीय नेत्यांवर ईडीची कारवाई होत असते. आता बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही ईडीच्या रडारवर आहे. ईडीकडून …

शिवसेनेच्या महिला नेत्याची पतीकडून हत्या : कारण वाचा

चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *