Breaking News

…तर वाघाचा मार्ग अडवणार्‍यांवर कारवाई करू – वनपरिक्षेत्र अधिकारी मून यांचा इशारा

Advertisements

…तर वाघाचा मार्ग अडवणार्‍यांवर कारवाई करू
– वनपरिक्षेत्र अधिकारी मून यांचा इशारा
चंद्रपूर,
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील मोहुर्ली-पद्मापूर या मार्गावर दोन वाघ नैसर्गिकरित्या भ्रमण करीत असताना त्याचा मार्ग अडवण्याचा प्रकार एक चित्रफितद्वारे पसरला. याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली असून, दोन दिवसात त्यांचे उत्तर न आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी मून यांनी दिला आहे.

Advertisements

वाघ मार्गावर फिरत असताना त्यांच्या जवळून भ्रमणध्वनीने चित्रिकरण करण्याची आणि वाघांच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण करीत असल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. याप्रकरणी ताडोबा प्रशासनाने अरविंद बंड, संकेत वेखंडे, शालीक जागवे व साहिल बेग यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दोन दिवसात उत्तर न दिल्यास गुन्हा दाखल करू, असे त्यात म्हटले आहे.

Advertisements

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाचे व अन्य प्राण्यांचे दर्शन सहसा होतच असते. सोमवारी ताडोबाच्या मोहुर्ली, पद्मापूर ते चंद्रपूर मार्गावर दोन वाघांनी अंदाजे सकाळी 9 ते 10 वाजताच्या दरम्यान नागरिकांना वाघांचे दर्शन झाले. अनेकांनी यावेळी व्याघ्रदर्शनाचा मनमुराद आनंद घेतला. आगरझरी परिसरात हे दोन वाघ रस्त्याने येत असल्याचे दिसताच दोन्ही बाजूची वाहने जागीच थांबली. दोन्ही वाघ आरामात दुचाकीस्वारांकडे येत असल्याचे चित्रफितीत दिसत आहे. काहींनी वाघ आपल्याकडे येत असल्याचे पाहून वाहने मागे घेतली, मात्र काही दुचाकीस्वारांनी वाघ अगदी जवळ येत असतानाही तिथेच थांबून त्यांचा मार्ग अडवत होते. ताडोबा परिसरात काही युवक कॅमेरे घेवून या मार्गावर हुल्लडबाजी करतात. अशी हुल्लडबाजी करणार्‍यांवर कारवाईची मागणी आता होत् आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

गडचिरोलीतील आलापल्ली-सिरोंचा रोडच्या दूरवस्थेची याचिका हायकोर्टात

गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा या १०० किलोमीटर रोडच्या दूरवस्थेवर दोन आठवड्यात उत्तर सादर करा, …

राज्यात 15 एप्रिलनंतर पुन्हा पाऊस?

हवामानात का झाले बदल   हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामान झालेल्या या बदलाचे कारण आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *