कोसंबी येथे ६ जून ला रक्तदान शिबीराचे आयोजन
शिवराज्य दिनानिमित्त ग्रामपंचायत व युवकांचा पुढाकार
चंद्रपूर :
महाराष्ट्र शासनाने नव्याने यंदापासून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस संपुर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थात गुढी उभारुन अभिवादन करुन साजरा करण्याचे आदेश दिले आहे. महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने हा सोहळा संपन्न व्हावा असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर मुल तालुक्यातील ग्रामपंचायत कोसंबी व सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, सक्षम युवा मंडळ, पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ६ जून रोजी कोसंबी येथे सकाळी १० ते ५ वेळात रक्तदान शिबीर पार पडेल. कोरोनाच्या संकटात रक्तपुरवठा आवश्यक असून राज्यभिषेक दिनानिमीत्त मोठ्या संख्येने नागरीकांनी रक्तदान करावे असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ मयूर कळसे, ग्रामसेवक सुरज आकनपल्लीवार, सरपंच रविंद्र कांबळी व गावातील युवक मंडळांनी केले आहे.