Breaking News

डोणी जंगलात वाघिणीचा मृत्यू

Advertisements

डोणी जंगलात वाघिणीचा मृत्यू

Advertisements

मूल-
तोडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या बफर क्षेत्रातील मूल वनपरितक्षेत्रच्या नियत क्षेत्र डोणी-1 कक्ष क्रमांक 327 मध्ये शनिवार, 5 जून रोजी 10 वाजताच्या सुमारास एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती वरिष्ठ वनाधिकार्‍यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृत वाघणीला चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात आणून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचे दहन करण्यात आले. या वाघीणीचा मृत्यू जखमांमुळे रक्तस्त्राव झाल्याने झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisements

डोणी 1 चे वनरक्षक यांना ही वाघीण 2 जून रोजी दूपारी 2 वााजताच्या सुमारास डोणी गावापासून अंदाजे 1.5 किलोमीटर अंतरावर दाट झुडपाखाली बसून असलेली आढळून आली होती. मात्र, ती त्या ठिकाणाहून न उठल्याने तिला विशेष निरक्षणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी ती मृतावस्थेत आढळली. ही कार्यवाही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफर) व सहायक वनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पाच दिवसापूर्वी या जंगलात दोन वाघांची झुंज झाल्याचे बोलले जात होते. मृत वाघीण त्यापैकीच असावी, असा अंदाज वन कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी मात्र, मृत वाघीण विषयी कुठलाही अंदाज व्यक्त केलेला नाही.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *