Breaking News

रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात आता कामाची सुरुवात कधी ? (नागरिकांचा प्रश्न)

रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात आता कामाची सुरुवात कधी ? (नागरिकांचा प्रश्न)
कोरपना(ता.प्र.):-
      कोरपना तालुक्यातील वनसडी,पिपर्डा, कारगाव(बु)रस्त्याचे खडीकरण व मजबूतीकरणाची कामे २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाल्याचे कळते.सदर मार्ग हा ८ ते १० गावांकडे व पकडीगुड्डम डॅमकडे जाणारा व दोन तालुक्याला जोडणारा मार्ग असून याकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप होत आहे.सदर मार्ग हा विविध वाहने व नागरिकांना गैरसोयीचा ठरत असून दोन महिन्यापूर्वी या कामाचे भूमिपूजन पार पडले.पुर्ण नाही कमीतकमी पावसाळ्यापूर्वी या मार्गावरील खड्डे तरी बुजेल अशी आशा नागरिकांना होती.मात्र पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतांनाही कामाची सुरुवात काही झालेली नाही ! अल्पशा पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्याने यातून प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे.यंदाही पाणीयुक्त खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार की काय अशी शंका व्यक्त करत “भूमिपूजन थाटामाटात” मग कामाला सुरुवात कधी अशी विचारणा नागरिक करताना दिसत आहे.
      दोन महिने लोटूनही सदर मार्गावर संबंधीत ठेकेदाराकडून साहित्याची जुळवाजुळव झालेली दिसत नसून पावसापूर्वी खड्डे तरी बुजवले जातील का? असा प्रश्न उपस्थित करत सदर रस्त्याचे कामाला तात्काळ सुरूवात करावी अशी मागणी पिपर्डा,कारगाव, मरकागोंदी,धनकदेवी येरगव्हाण सह संबंधित गावांच्या नागरीकांनी केली आहे.आता संबंधित याकडे केव्हा लक्ष देणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *