Breaking News

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्र वाढवणार  – नऊ गावांची जमीन संपादित करणार

ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्र वाढवणार
– नऊ गावांची जमीन संपादित करणार
मुंबई,
ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये वन्य प्राण्यांकरिता गाभा क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी संबंधित चंद्रपूर आणि सिंदेवाही तालुक्यातील नऊ गावांच्या पुनर्वसनासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील कोअर क्षेत्र वाढविण्यासंदर्भात आणि आरे वनक्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

ठाकरे म्हणाले की, वन्यप्राण्यांच्या संचारासाठी ताडोबा वनक्षेत्रात कोअर क्षेत्र वाढविणे गरजेचे असून, त्यासाठी चंद्रपूर तसेच सिंदेवाही तालुक्यातील नऊ गावांची जमीन संपादित करणे गरजेचे आहे. संबंधित गावातील रहिवाशांचे पुनर्वसन आणि सर्व मूलभूत सुविधांचा आढावा घेऊन याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *